'या' चित्रपटातून चित्रांगदाचे बॅालिवूडमध्ये पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 18 March 2020
  • ‘बाझार’ चित्रपटानंतर अभिनेत्री चित्रांगदा सिंग रुपेरी पडद्याकडे फिरकलीच नाही.

‘बाझार’ चित्रपटानंतर अभिनेत्री चित्रांगदा सिंग रुपेरी पडद्याकडे फिरकलीच नाही. आता जवळपास एक ते दीड वर्षांनी ती ‘बॉब विश्‍वास’ या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. बॉलिवूडमधील बरेच नट-नट्या भूमिकेची गरज म्हणून आपल्या शरीररचनेत बदल करत असतात.

चित्रांगदानेही अगदी तसंच केलं आहे. ‘बॉब विश्‍वास’मधील आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय मिळावा म्हणून तिने चक्क वजन वाढवलं आहे. त्यासाठी चित्रांगदाने चक्क वर्कआऊटला रामराम केला. चित्रांगदा म्हणते, ‘मला माझ्या भूमिकेसाठी वजन वाढवणं गरजेचं होतं. त्यासाठी काही महिने मी वर्कआऊट केलं नाही. इतरवेळी मी डाएटमुळे बरेच पदार्थ खात नाही. पण मजेशीर गोष्ट म्हणजे यादरम्यान मी माझ्या आवडीचे सगळेच पदार्थ खात होते.’ ‘बॉब विश्‍वास’ हा क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News