मुलांंमध्ये शिक्षणाबरोबरच खेळाची आवड निर्माण करणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 February 2020

या क्रीडा स्पर्धेत केंद्रातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले व विजेते, उपविजेते संघातील खेळाडूंना ढाल व पदके देऊन गौरविण्यात आले. 

मंदाणे :  पालकांसह शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर मैदानी खेळाची आवड निर्माण केली पाहिजे. मोबाईलपासून मुलांना दूर ठेऊन मैदानी खेळांबाबत सराव व सातत्य ठेवले पाहिजे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी ए. डी. पाटील यांनी घोडलेपाडा येथे केले.जिल्हा परिषद मंदाणे केंद्रांतर्गत केंद्रास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या बक्षीसवितरणप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती रवींद्र पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी पी. टी. सपकाळे, गटशिक्षणाधिकारी ए. डी. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी उषा पेंढारकर, डी. टी. वळवी, एस. एस. बंजारा, सुनील तावडे, घोडलेपाडा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमलाल पावरा, जिल्हा परिषद सदस्य सुभाष पटले, मंगला जाधव, पंचायत समिती सदस्य प्रकाश पावरा, सदस्या ललिता बाविस्कर, सदस्या सुषमा साळुंखे, योगेश पाटील, चांदसैलीचे सरपंच आनंदा पवार, मंदाणेचे उपसरपंच अनिल भामरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर मोरे, शरद साळुंखे, राजू बाविस्कर, केंद्रप्रमुख मोहन बिसनारीया आदी उपस्थित होते.

या क्रीडा स्पर्धेत केंद्रातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले व विजेते, उपविजेते संघातील खेळाडूंना ढाल व पदके देऊन गौरविण्यात आले. गटशिक्षणाधिकारी पाटील यांनी खेळांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले पाहिजे. खेळाडू तयार करतांना हंगामी खेळ न खेळवता त्यात सातत्य व सराव ठेवला पाहिजे असे सांगितले.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून सर्वच सहभागी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कोळपांढरी शाळेला गुणवत्ता विकासात राज्यात पुरस्कार मिळाल्याबद्दल त्या शाळेतील शिक्षकांनाही गौरविण्यात आले. केंद्रप्रमुख मोहन बिसनारिया यांनी प्रास्ताविक केले. प्रीतम रनाळे यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार आकुसकर, संजय मोरे यांनी आभार केले. कोळपांढरीचे मुख्याध्यापक राजू पावरा, शिक्षक रवींद्र बडगुजर, वसंत पावरा, यमुना चव्हाण, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका वर्ग आदींनी परिश्रम घेतले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News