फॅशनच्या नव्या ट्रेंडची आव्हाने

एस. डी. आहिरे
Friday, 7 February 2020

ग्राहकांमध्ये अलीकडे सौंदर्याविषयी जागरूकता आल्याने सलून व्यावसायिकांना बदलत्या काळानुसार सुविधा द्याव्या लागत आहेत. महिलांप्रमाणे पुरुषांमध्येही सौंदर्य खुलविण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे हा व्यवसाय आता कटिंग, दाढीपुरता मर्यादित राहिलेला नाही.

पिंपळगाव बसवंत : कधी काळी सलून व्यवसाय म्हटला, की तो दाढी, कटिंगपुरता मर्यादित असायचा. आता हा व्यवसाय फॅशनच्या नव्या ट्रेंडची आव्हाने स्वीकारत वाटचाल करीत आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाला शहरी चेहरा मिळत असताना, मेन्स पार्लरही झपाट्याने वाढत आहे. मुंबई, नाशिक, पुण्याच्या धर्तीवर शहरातील सलून व्यवसाय दिवसागणिक कूस बदलत आहे. टपरीपासून ते एअर कंडिशन, लक्‍झरिअस दालनापर्यंतचे परिवर्तन सलून व्यवसायात बघायला मिळत आहे. नव्या ट्रेंडवर स्वार होत सलूनचा चेहरामोहरा बदलत आहे.

सलून व्यवसायात नव्वदीच्या दशकापासून नवी स्थित्यंतरे येऊ लागली. महिला चेहरा, केसांची निगा राखतात, तशीच हौस पुरुषांमध्ये वाढीला लागली आहे. विशेषत: युवकांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ब्लिचिंग आणि फेशिअलसोबतच आता मसाज आणि हेअरडाय या पुरुषी हौसेच्या बाबी सलून व्यवसायात अलीकडे रुजू झाल्या आहेत. मात्र, बदलत्या नव्या ट्रेंडनुसार केशकर्तनात कंगव्याचा वापर कमीत कमी व बोटांचा वापर जास्तीत जास्त असून, फिंगर कट स्पेशालिस्ट उदयास आले आहेत. या व्यवसायात बदलत्या फॅशनबरोबरच लक्षणीय बदल झाला आहे.

ग्राहकांच्या चॉइसकडे लक्ष

सलून दुकानात ग्राहकांना विरंगुळा म्हणून मोठे स्क्रिनचा टीव्ही, ग्राहकांना आवडतील अशी म्युझिक सिस्टिमद्वारे गाणी लावली जातात. ग्राहकांना वाचनीय पुस्तके, विविध भाषांतील वृत्तपत्रे ठेवली जात आहेत. ग्राहकांकडून पैसे स्वीकारण्यासाठी आता पेटीएम, स्वॅप मशिनची सेवा सुरू केल्याने कॅशलेस व्यवहाराकडेही सलून व्यावसायिकांनी वाटचाल सुरू केली आहे.

सलून कारागिरांची कमतरता

सलून व्यवसाय कलाप्रकार आहे. सलून व्यवसाय शिकलेले युवक आपले स्वत:चे दुकान टाकत असल्याने नाशिक जिल्ह्यातील दुकानांमध्ये सलून कारागीर शोधूनही सापडत नाहीत. त्यात मिळालेला कारागीर जास्त दिवस एकाच दुकानात थांबत नसल्याने सलून व्यावसायिकांना बाहेर राज्यातील कारागीर आणावे लागत आहेत. ते टिकून ठेवण्यासाठी कसरतही करावी लागत असल्याचे व्यावसायिक सांगतात. 

दृष्टिक्षेपात...

नाशिक, मुंबई, पुणेसारख्या सुविधा जिल्ह्यातील निमशहरांमध्ये 
स्पर्धा व फॅशनमुळे सलूनचाच बदलला चेहरामोहरा 
व्यवसायात आधुनिक अवजारांचा वापर 
कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News