विद्यापीठ प्रशासनासमोर निकाल वेळेत लावण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 March 2020
  • मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सुमारे ७५० परीक्षांचे वेळापत्रक बिघडले आहे. मार्च महिन्यानंतर परीक्षा सुरू होणार असल्याने यंदाचे निकालही विलंबाने लागण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा ३१ मार्चनंतर घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सुमारे ७५० परीक्षांचे वेळापत्रक बिघडले आहे. मार्च महिन्यानंतर परीक्षा सुरू होणार असल्याने यंदाचे निकालही विलंबाने लागण्याची शक्‍यता आहे.

इतर विद्यापीठात किंवा परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निकाल वेळेत लावण्याचे आव्हान आता विद्यापीठ प्रशासनाला पेलावे लागणार आहे.

मुंबई विद्यापीठाने विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार उन्हाळी सत्राच्या परीक्षा २३ मार्च ते २ जून या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यापीठाची महत्त्वाची मानली जाणारी तृतीय वर्ष बी.कॉम. सत्र ६ची परीक्षा २३ मार्चपासून सुरू .
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News