गरीब विद्यार्थ्यांसाठी काढणार सीबीएसई आणि आयसीएसई शाळा?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

जोगेश्‍वरी (पूर्व) येथील सीबीएसई आणि माहीम येथे आयसीएसई शाळा सुरू होणार असून त्यासाठी सहा दिवसांत सुमारे साडेआठशे अर्ज प्राप्त झाले आहेत.

मुंबई : महापालिका हद्दीतील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई महापालिकेने सीबीएसई आणि आयसीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जोगेश्‍वरी (पूर्व) येथील सीबीएसई आणि माहीम येथे आयसीएसई शाळा सुरू होणार असून त्यासाठी सहा दिवसांत सुमारे साडेआठशे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक पसंती सीबीएसई शाळेला मिळाली असून तेथे ७१९; तर आयसीएसई शाळेसाठी आतापर्यंत केवळ १२९ अर्ज प्राप्त झाले आहेत. 

सीबीएसईची बोर्डाची शाळा पालिकेच्या जोगेश्‍वरी पूनमनगर मनपा शाळेत; तर आयसीएसई बोर्डाची शाळा माहीम पश्‍चिमेकडील वूलन मिल मनपा शाळेमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही बोर्डाच्या शाळा या सध्या प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणार आहेत. त्यानुसार दोन्ही शाळांमध्ये ज्युनियर, सीनियर केजी पहिली ते सहावीचे वर्ग २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येणार आहेत.

या शाळांच्या प्रवेशाची प्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू झाली. प्रवेशासाठी पालकांना १२ मार्चपर्यंत अर्ज करता येईल. आठवडाभरात सीबीएसई शाळेतील ज्युनिअर ते सहावीपर्यंतच्या प्रवेशासाठी ७१९ अर्ज आले आहेत. पालकांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येत आहे. तसेच, http://bit.do/Mybmc-ICSE-CBSE या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News