खासगी शिकवण्यांतून होणारी पिळवणूक थांबणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

ज्यात शहरांपासून ते ग्रामीण भागात खासगी शिकवण्याचे पेव फुटेल आहे. त्यावर नियंत्रण ठेवणारी खासगी शिकवण्यांवर नियंत्रणासाठी कायदा तयार करणाऱ्या समितीने मसुदा तयार केला आहे.

पुणे : खासगी शिकवण्यांमधून पालक व विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याचा मसुदाही तयार करण्यात आला. मात्र, हे विधेयक विधिमंडळात मांडून त्याचे कायद्यात रूपांतर करण्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हे विधेयक अडगळीत पडले आहे. 

राज्यात शहरांपासून ते ग्रामीण भागात खासगी शिकवण्याचे पेव फुटेल आहे. त्यावर नियंत्रण ठेवणारी खासगी शिकवण्यांवर नियंत्रणासाठी कायदा तयार करणाऱ्या समितीने मसुदा तयार केला आहे. हा कायदा चालू अधिवेशनात येणार नाही. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा झाली असून, त्यावर लवकरच निर्णय होईल.
- विशाल सोलंकी,
शिक्षण आयुक्त

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News