युवकांमध्ये ब्रॅंडेड घड्याळ्यांची क्रेझ कायम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

हातावर घड्याळ नसेल तर काहीतरी हरवल्यासारखे वाटते. त्‍यामुळे सध्या मोठ्या आकाराची व जाड लेदरच्या घड्याळीचा अधिक वापर करतो. नेहमी घड्याळ वापरत असल्याने सतत त्‍या हाताकडे लक्ष जाते. कामेही वेळेप्रमाणे होतात.
 

हिंगोली : मोबाईलच्या जमान्यात देखील युवकांमध्ये मनगटी घड्याळींची क्रेझ कायम असून ब्रँडेड घड्याळे, जाड लेदर व नाजुक साखळ्यांच्या विविध व्हरायटीच्या घड्याळांना आजही मागणी कायम आहे. 

एकेकाळी मनगटी घड्याळींची चलती होती. प्रत्‍येकाच्या हातावर मनगटी घड्याळे दिसत होती. मात्र, यात स्‍पर्धा झाल्याने लेदर पट्ट्याऐवजी गोल्‍डन व सिल्‍व्‍हरचा पट्टा असलेल्या घड्याळी बाजारात आल्या आहेत. पूर्वी लग्नात नवरदेवला वधुपित्याकडून हमखास घड्याळ दिली जात असे. नवदेवाकडून त्‍याची मागणीदेखील केली जात आहे. कित्येक नवरदेव घड्याळीसाठी रुसल्याचे जुनेजाणकार सांगतात. काही वर्षांपासून मोबाईचा वापर सुरू झाला. मोबाईलध्येच घड्याळ आल्याने मनगटी घड्याळ मागे पडले. दुरुस्‍ती करणारे कारागीरदेखील बोटावर मोजण्या इतके शिल्‍लक राहिले आहेत. 

मात्र, पुन्हा एकदा मनगटी घड्याळांना चांगले दिवस आल्याने परत त्‍याची मागणी वाढली आहे. युवकांत ब्रँडेड घड्याळींचा वापर वाढला आहे. सध्या युवकांत विविध नामांकित कंपन्यांच्या घड्याळी वापरण्याची फॅशन आली आहे. जाड लेदरपासून नाजूक साखळीच्या व्हरायटींना युवकांतून पसंती दिली जात आहे. विविध कपंन्यांच्या घड्याळींची किंमत पाचशे ते हजारो रुपयांपर्यंत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. मुलींमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या घड्याळींना पसंती असून रिबिन्स, रिंग्ज असलेल्या तसेच क्रिस्‍टन मोत्यापासून तयार झालेल्या बेल्‍टला चांगली मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News