भोंदू बाबाने केला पाच तरूणींवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

२२ जानेवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यानच्या कालावधीत पिंपरीमध्ये घडलेल्या या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे

रोहा : पुत्रप्राप्ती आणि गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २२ जानेवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यानच्या कालावधीत पिंपरीमध्ये घडलेल्या या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सोमनाथ कैलास चव्हाण याला ताब्यात घेतले.

भोंदू बाबा मूळ रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्‍यातील खैरवाडी गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा प्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास ‘अंनिस’शी संपर्क साधण्याचे आवाहन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी केले आहे. ‘तुमच्या घरात मूल जन्माला येऊ नये म्हणून नात्यातील एका बाईने घरातील सदस्यावर करणी केली आहे. तुमच्या घरात सात पेट्या धन, एक सोन्याची घागर आणि एक गणपतीची मूर्ती असे गुप्तधन असून घरातील एका मुलीचा जीव धोक्‍यात आहे’, अशी भीती भोंदू बाबा सोमनाथ याने पीडितेच्या कुटुंबीयांना घातली होती.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News