शोतोकोन कराटे स्पर्धेत बारामतींच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

या वर्षीच्या लीगसाठी असणारी चॅंपियन ऑफ चॅंपियनची दुचाकी मुलांच्या खुल्या गटामध्ये बारामतीच्या महेश डेंगळे यांनी जिंकली. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ही गाडी प्रदान करण्यात आली.

बारामती : रांजणगाव येथे आयोजित शोतोकॉन कराटे क्‍लबच्या आयोजित कराटे स्पर्धेत बारामती कराटे असोसिएशनच्या ९० खेळाडूंनी सहभाग घेतला. यात प्रामुख्याने ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल, म.ए.सो हायस्कूलच्या खेळाडूंचा सहभाग लक्षणीय होता.

स्पर्धेत बारामतीच्या कराटेपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ३५ सुवर्ण, ३० रौप्य,२५ कांस्यपदकांची लयलूट केली. या वर्षीच्या लीगसाठी असणारी चॅंपियन ऑफ चॅंपियनची दुचाकी मुलांच्या खुल्या गटामध्ये बारामतीच्या महेश डेंगळे यांनी जिंकली. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ही गाडी प्रदान करण्यात आली.

२१ वर्षांखालील मुलाच्या गटाच्या चॅंपियन ऑफ चॅंपियनच्या उपविजेता पदाचा मान बारामतीच्याच राजन शिंदे यास मिळाला. त्याला २५ हजारांच्या रोख रकमेसह चषक देऊन सन्मानित केले.१८ वर्षांखालील गटात बारामतीच्या श्रुती करळे, फरजाना पठाण, अनुज तावरे, सुमेध कांबळे, हर्षद सागडे या विजेत्यांना सायकल देऊन गौरविण्यात आले. ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूललाही विशेष सहभागाकरिता सायकल व चषक देऊन गौरविण्यात आले.बारामती कराटे असोसिएशनने लीगचा दुसऱ्या क्रमांकाचा चषक पटकावला.

बारामती कराटे असोसिएशन व शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांचा गौरव करणार असल्याचेही रवींद्र करळे यांनी सांगितले आहे. यशस्वितांना बारामती कराटे असोसिएशनचे प्रशिक्षक रवींद्र करळे अभिमन्यू इंगुले, महेश डेंगळे, राजन शिंदे, ओंकार झगडे, ऋषीकेश डेंगळे, आयेशा शेख, मुकेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News