विद्यार्थ्यानो आपल्यामधील उद्योजक वृत्ती जागृत करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच आपल्यामधील उद्योजक वृत्ती जागृत करून छोट्या, छोट्या आवश्‍यकतेवरून उद्योगाची निर्मिती करावी. कोणतेही कार्य करताना ते प्रामाणिकपणे जिद्दीचे व त्यात नियमितता असावी.

गोंदिया : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच आपल्यामधील उद्योजक वृत्ती जागृत करून छोट्या, छोट्या आवश्‍यकतेवरून उद्योगाची निर्मिती करावी. कोणतेही कार्य करताना ते प्रामाणिकपणे जिद्दीचे व त्यात नियमितता असावी. भविष्यात यशस्वी होण्यासाठी जवळचे मित्र सोबत असावे. विद्यार्थ्यांनी नेहमी पुस्तकांची मित्रता करावी, असे प्रतिपादन महाबळेश्‍वर येथील सन राइज कॅण्डल कंपनीचे संस्थापक डॉ. भावेश भाटिया यांनी व्यक्‍त केले.येथील नमाद महाविद्यालयातील ऑडीटोरियम येथे आयोजित एक दिवसीय अभिप्रेरणा सेमिनारमध्ये ते बोलत होते.

हा कार्यक्रम संस्था सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रजनी चतुर्वेदी होत्या. यावेळी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलचे संयोजक डॉ. भावेश जसानी यांनी डॉ. भावेश भाटिया यांच्या जीवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक डॉ.सफीउल्ला खान यांनी, तर संचालन बी. कॉम. अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी पूजा पासवान, पूजा जसवानी, दिव्यानी लिल्हारे यांनी केले. यशस्वितेसाठी डॉ. राकेश खंडेलवाल, डॉ.रवींद्र मोहतुरे, डॉ. मुनेश ठाकरे, डॉ. खुशबू होतचंदानी, डॉ. शशिकांत चौरे, डॉ. गिरीश कुदळे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News