कोरोनामुळे चीनमधील आशियाई बॅडमिंटन स्पर्धा आता फिलिपिन्समध्ये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 7 March 2020

आशियाई बॅडमिंटन स्पर्धा अखेर कोरोनाचे उगमनस्थान मानले जात असलेल्या वुहानऐवजी मनिला येथे घेण्याचा निर्णय झाला आहे

मनिला : आशियाई बॅडमिंटन स्पर्धा अखेर कोरोनाचे उगमनस्थान मानले जात असलेल्या वुहानऐवजी मनिला येथे घेण्याचा निर्णय झाला आहे. ऑलिंपिक पात्रतेसाठी महत्त्वाची असलेली ही स्पर्धा २१ ते २६ एप्रिल दरम्यान होईल.

चीनमधील अनेक स्पर्धांप्रमाणे आशियाई बॅडमिंटन स्पर्धा रद्द होईल, अथवा लांबणीवर पडेल अशी चर्चा होती. त्यातच चायना मास्टर्स स्पर्धा रद्द झाल्यामुळे हीच शक्‍यता जास्त वर्तवली जात होती, पण जागतिक बॅडमिंटन महासंघाने ही स्पर्धा फिलिपिन्सला घेण्याचे ठरवले. आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा फिलिपिन्समध्येच झाली होती. त्या वेळी चीन तसेच हाँगकाँग खेळाडूंना १४ दिवस रुग्णालयात निरीक्षणाखाली रहावे लागेल असे सांगितले होते, परिणामी चीन आणि हाँगकाँगने माघारच घेतली होती.

या पार्श्वभूमीवर जागतिक बॅडमिंटन महासंघाने आशियाई बॅडमिंटन महासंघ तसेच फिलिपिन्स बॅडमिंटन संघटनेबरोबर चर्चा करणार आहे आणि खेळाडूंच्या व्हिसाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आशियाई स्पर्धा होणार असल्यामुळे साईना नेहवाल, किदांबी श्रीकांत, पारुपली कश्‍यप यांच्या ऑलिंपिक पात्रतेच्या आशा उंचावल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News