आपल्याला corona  virus  झालाय अशी शंका आहे? अशी करा खात्री.

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

आजारी असताना या व्हायरसपासून बचावाचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे घरी राहणे व वारंवार हात धुणे.तुम्ही कोरोना व्हायरसचे रुग्ण नसाल तरीही गरम पाणी आणि साबणाने हात धुतल्याशिवाय काहीही खाऊ नका तसेच वारंवार आपल्या चेहऱ्याला स्पर्श करू नका.

जगभरात corona virus पसरत आहे. काही महिन्यांपूर्वी चीन मध्ये या वायरसचा रुग्ण सर्वप्रथम सापडला होता. आणि आता भारतात देखील याचे रुग्ण आढळले आहेत. राज्यभरात रुग्णांची तपासणी होत आहे.

 आजारी असताना या व्हायरसपासून बचावाचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे घरी राहणे व वारंवार हात धुणे.तुम्ही कोरोना व्हायरसचे रुग्ण नसाल तरीही गरम पाणी आणि साबणाने हात धुतल्याशिवाय काहीही खाऊ नका तसेच वारंवार आपल्या चेहऱ्याला स्पर्श करू नका. हात धुतल्यावर स्वच्छ कपड्याने हात पुसून घ्या.

तुम्ही परदेशातून जाऊन आलेले आहेत,तुम्हाला मागील चार दिवस सर्दी असेल आणि आणि मनात जराही शंका असेल कि हे कोरोना व्हायरस चे लक्षण असू शकते तर त्वरित आपल्या जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्या. जेणेकरून तुम्हीही निश्चिन्त व्हाल आणि इतरांनाही त्याचा काही प्रादुर्भाव जाणवणार नाही. इतरांच्या संसर्गापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करा. कोरोनाच्या लक्षणांपैकी काहीही आढळून आले तर त्वरित टेस्ट करून घ्या परंतु फक्त सर्दी किंवा खोकला असेल तर घरीच उपाय करून हॉस्पिटलच्या मोठमोठया बिल पासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता.

जर तुम्हाला बरेच दिवस ताप,सर्दी, खोकला किंवा श्वसनाचा त्रास हि लक्षणे जाणवत असतील तर लगेच अत्यावश्यक सेवेला फोन करा. तुम्हाला संसर्ग झाला असेल तर इतरांच्या सान्निध्यात जाणे टाळा. आणि तुम्हाला या क्षणाला कोणतेही लक्षण जाणवत नसेल तर कसलीच काळजी करू नका. निवांत राहा.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News