झेडपीच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

राज्य शासनातर्फे दरवर्षी अनुसूचीत जाती-जमाती, दारिद्र्यरेषेखालील, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येतो़.

जालना : गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपात शासनाकडून होणारा भेदभाव दूर व्हावा अशी भावना जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे बोलून दाखवली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन लवकरच निधीची तरतूद करण्यात येणार आहे. 

राज्य शासनातर्फे दरवर्षी अनुसूचीत जाती-जमाती, दारिद्र्यरेषेखालील, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येतो़. गतवर्षी गणवेशाच्या अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र चारशे रूपयासाठी बँक खाते उघडणे शक्य नसल्याने हा निर्णय रद्द करण्यात आला. गणवेश वाटपाच्या प्रचलित  धोरणात  एकाच शाळेत शिकणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश दिल्या जात नाही.  

त्यामुळे त्यांच्यात भेदभाव आणि न्यूनगंडाची भावना निर्माण होते. अशी प्रतिक्रिया व्यक्त करत या धोरणामुळे लहान वयात जातीभेद निर्माण होण्याचा प्रकार गणवेश वाटपावरून होत असल्याने सर्वच मुलांना मोफत गणवेश वाटप करण्यात यावा, अशी मागणी  जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. यावर श्री. टोपे यांनी सकारात्मकता दाखवत जिल्हा वार्षिक योजनेतुन गणवेशासाठी तरतूद करण्याबाबत विचार करण्यात येईल असे सांगितले आहे. 

सामाजिक ऐक्याची व सर्वधर्म समभावाची भावना वृिद्धंगत करण्यासाठी सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणे गरजेचे आहे. पालकमंत्री राजेश टोपे याबाबत सकारात्मक आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात किंवा जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून यासाठी तरतूद करण्याचा प्रयत्न करणार आहे.
-पूजा सपाटे, सभापती, जिल्हा परि

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News