अक्षयच्या 'सूर्यवंशीचा' सोशल मीडियावर धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

सूर्यवंशीसोबत सिंघम चित्रपटातील बाजीराव सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगण आणि सिंबा चित्रपटातील संग्राम भालेराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंह यांचीही एण्ट्री होताना दिसते.

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटात बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची कथा मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये अक्षय वीर सूर्यवंशीची मुख्य भूमिका साकारत असून, जबरदस्त ॲक्‍शन करताना दिसत आहे.

सूर्यवंशीसोबत सिंघम चित्रपटातील बाजीराव सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगण आणि सिंबा चित्रपटातील संग्राम भालेराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंह यांचीही एण्ट्री होताना दिसते. अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या मुख्य भूमिकेसह अभिनेता जॅकी श्रॉफ, जावेद जाफरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपट येत्या २४ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News