अकोला संघाचा वाशीमवर दणदणीत विजय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळलेल्या गेलेल्या या दोन दिवसीय सामन्यात पहिल्या दिवशी अकोला संघाने समीर डोईफोडेच्या भेदक माऱ्याच्या बळावर वाशीमचा डाव झटपट गुंडाळल्यानंतर १८० धावांची आघाडी घेतली होती.

अकोला : विदर्भ क्रिकेट संघटना आणि जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खैरागड आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोला जिल्हा संघाने वाशीम जिल्हा संघाचा एक डावा आणि  ३२ धावांनी पराभव केला. 

अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळलेल्या गेलेल्या या दोन दिवसीय सामन्यात पहिल्या दिवशी अकोला संघाने समीर डोईफोडेच्या भेदक माऱ्याच्या बळावर वाशीमचा डाव झटपट गुंडाळल्यानंतर १८० धावांची आघाडी घेतली होती. दिवसअखेर २ बाद ४४ धावांपर्यंत मजल मारणारा वाशीम जिल्हा संघ मंंगळवारी १४८ धावा काढून गारद झाला. ज्ञानेश्‍वर देशमुखने ३३ आणि  अक्षय गुडेवारने ४४ धावा काढून झुंज दिली. मात्र पीयूष सावरकरच्या अचूक माऱ्यापुढे ही झुंड अपयशी ठरली. पीयूषने १३ षटकात २८ धावांच्या मोबदल्यात ५ गडी बाद केले. पहिल्या डावात हिरो ठरलेल्या समीर डोईफोडेने दुसऱ्या डावातही २ गडी बाद केल. गणेश भोसलेनेही २ गडी बाद करून त्याला चांगली साथ दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News