'या' अभिनेत्रीला लागली बिग बजेट चित्रपटांची लॉटरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 March 2020
  • 'कमांडो ३’ या ॲक्‍शन थ्रीलर चित्रपटात अभिनेत्री अंगिरा धारने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

'कमांडो ३’ या ॲक्‍शन थ्रीलर चित्रपटात अभिनेत्री अंगिरा धारने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. फक्त चित्रपटांमध्येच नव्हे तर डिजिटल विश्‍वातही अंगिराने तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता तिला एका बिग बजेट चित्रपटाची लॉटरीच लागली आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्‍यप यांच्या ‘तल्ख’ चित्रपटासाठी अंगिराच्या नावाची वर्णी लागली आहे. ती म्हणते, अनुराग यांनी माझा ‘लव परस्कवेअर फुट’ चित्रपट पाहिला. आणि माझं काम पाहून त्यांनी मला लगेचच फोन केला. ‘तल्ख’ चित्रपटाची कथा त्यांनी मला भेटून सांगितली अन्‌ या चित्रपटाची ऑफर केली. मी या चित्रपटासाठी सध्या जर्मन भाषा शिकत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News