किडनीथॅानमध्ये धावले १३० प्रत्यारोपण रुग्ण आणि ८० किडनीदाते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

कार्यक्रमादरम्यान किडनी आजार व अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी माहितीपत्रके लावण्यात आली होती.

औरंगाबाद : जागतिक किडनी दिनानिमित्त रविवार  ‘किडनीथॉन २०२०’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटल व नेफ्रॉन किडनी केअर यांच्यातर्फे करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये दोन हजार १३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धकांसोबत किडनी प्रत्यारोपण झालेले १३० प्रत्यारोपण रुग्ण आणि ८० किडनीदाते यांचा सहभाग या मॅरेथॉनचे मुख्य वैशिष्‍ट्य ठरले. किडनी निरोगी ठेवण्यासाठी सुदृढ जीवनशैलीचे महत्त्व जनमानसात प्रसारित करण्यासाठी किडनीथॉन १० किमी, पाच किमी व दोन किमी या गटात पार पडले.

किडनीथॉन स्पर्धेच्या प्रारंभप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, वीरजी सफाया, सिग्मा ग्रुपचे संचालक डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. मनीषा टाकळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे, डॉ. सुरेश साबू, डॉ. सचिन सोनी, डॉ. सोनाली साबू, डॉ. श्रीगणेश बर्नेला, श्‍वेता बर्नेला यांची उपस्थित होती.

मराठवाड्यातील प्रथम भिन्न रक्तगट किडनी प्रत्यारोपित रुग्ण दत्तात्रय खोलगडे, वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले किशोर सूर्यवंशी यांनीही यामध्ये सहभाग घेतला. किडनी प्रत्यारोपण झालेले अकोल्याचे पॅथॉलॉजिस्ट डॉ. योगेश भाटीवाल या सर्वांची इव्हेंट अॅम्बेसिडर म्हणून विशेष उपस्थिती होते. कार्यक्रमादरम्यान किडनी आजार व अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी माहितीपत्रके लावण्यात आली होती. किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांनी आहाराबद्दल घेण्याची काळजी या विषयावर आहारतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचा समारोप बक्षीस वितरणाने झाला. 

यांना मिळाले पारितोषिक

स्पर्धेत दहा किलोमीटरच्या विविध गटांत नितीन तालिकोट, अमृता गायकवाड, पंकज फाळके, विठाबाई काचवे, अशोक अमोणे, माधुरी निमजे यांनी प्रथम तर पाच किलोमीटर विविध वयोगटांत संजय धवणे, शीतल जाधव, संतोष वाघ, प्रतिभा नाडकर, केशव मोटे, सुहासिनी शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News