कोरोनावर जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी भरवली शाळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 March 2020

कोरोना विषाणूची लक्षणे आणि त्यावरील उपाय, याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई उपनगरातील घाटकोपर पूर्वेच्या शिवाजी शिक्षण संस्था बहुउद्देशीय टेक्‍निकल हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी कोरोना विषयावर नुकतीच एक तासाची शाळा भरवली होती.

घाटकोपर : कोरोना विषाणूची लक्षणे आणि त्यावरील उपाय, याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई उपनगरातील घाटकोपर पूर्वेच्या शिवाजी शिक्षण संस्था बहुउद्देशीय टेक्‍निकल हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी कोरोना विषयावर नुकतीच एक तासाची शाळा भरवली होती.

कोरोनाची भीती कमी करण्यासाठी तसेच त्यावरील उपाय काय आहेत, हे सांगण्यासाठी ६ वी आणि ८ वीच्या सृष्टी कटाळे, पूर्वा गावकर, सानिका मांडके, कोमल साळुंखे व भूमी म्हासुरकर या विद्यार्थिनींनी शिक्षक होऊन वर्गावर्गात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मास्क आणि सॅनिटरीचा वापर तसेच उघड्यावरचे खाणे टाळणे, शिंक वा खोकला आल्यास काही अंतरावर जाऊन पूर्ण तोंड झाकून तो करणे, गर्दीचे ठिकाणे टाळणे, सर्दी- ताप आणि खोकला असल्यास डॉक्‍टरांकडून त्वरित उपचार करून घेणे या मुद्द्यांवर त्यांनी जनजागृती केली. मुख्याध्यापिका फरिदा सनदे यांनी विद्यर्थिनींना मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे चिटणीस नंदकुमार नरे, पर्यवेक्षक हरेश जाधव शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News