फलदांजीत अमूलाग्र बदल करणे भारतीय संघासाठी महत्त्वाचं

सुनंदन लेले
Friday, 28 February 2020

वेलिंग्टन कसोटी पहिल्या डावातील खराब फलंदाजी हे एक मुख्य कारण होते.

ख्राईस्टचर्च : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ हॅगली पार्क मैदानावर सरावासाठी उतरला. दुसऱ्या कसोटीत यशाचा मार्ग शोधायचा झाल्यास आम्हाला सुधारणा करावीच लागेल. आम्ही फलंदाजीत बदल करणार आहोत; ज्यातून गोलंदाजांच्या मनात संशय निर्माण करायच्या योजनेचा विचार करतो आहोत, असे उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेने सांगितले.

वेलिंग्टन कसोटी पहिल्या डावातील खराब फलंदाजी हे एक मुख्य कारण होते. काय अडचणी येत होत्या चांगल्या वेगवान गोलंदाजांना तोंड देताना, असे विचारले असता अजिंक्‍य रहाणे म्हणाला, ‘‘जेव्हा बेसीन रिझर्व्हच्या खेळपट्टीवर होता, तसा चेंडू थोडा थांबून उसळी घेत असताना नेहमीच्या सवयीने पाय पुढे टाकून खेळून चालत नाही. चेंडू थांबून येत असल्याने फलंदाजाचा अंदाज चुकतो आणि मग बॅट पायाच्या पुढे जायला लागते. जेव्हा शरीरापासून दूर चेंडू खेळू लागतो तेव्हा चुका वाढतात. न्यूझीलंड गोलंदाजांनी  वातावरणाचा अंदाज होता आणि त्यांनी वाऱ्याचा उपयोग चांगला केला.’’

‘‘फलंदाजांना स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल. गोलंदाज भले ताज्या खेळपट्टीचा फायदा घेत तिखट मारा करत असले तरी फलंदाज म्हणून काही बदल करावेच लागतील. असे सांगताना अजिंक्‍य रहाणेने, कधी थोडेसे पुढे चालत येऊन तर कधी उभे राहताना क्रिजमधे मागे सरकून किंवा पुढे उभे राहून गोलंदाजाचा अंदाज चुकवायला प्रयत्न करावे लागतील, असे स्पष्ट केले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News