कर्णधार हरमनप्रीतचा संघाला नवा सल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

प्रामुख्याने फलंदाजीत ज्या चुका केल्या, त्या सुधाराव्या लागतील, आता पुढील सामने महत्त्वाचे असणार आहेत, असा सल्ला कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे.

मेलबर्न :  प्रामुख्याने फलंदाजीत ज्या चुका केल्या, त्या सुधाराव्या लागतील, आता पुढील सामने महत्त्वाचे असणार आहेत, असा सल्ला कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे. महिला टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी निश्‍चित झाल्यावर ती बोलत होती.

न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात १३३ धावाही भारतीय गोलंदाजांनी निर्णायक ठरवल्या. संघ म्हणून अशा प्रकारे कामगिरी होत असेल तर निश्‍चितच समाधान वाटत असते. एक साखळी सामना शिल्लक असताना उपांत्य फेरी निश्‍चित होणे आत्मविश्‍वास वाढवणारे असते. परंतु आम्ही काही चुका केल्या आहेत. पहिल्या दहा षटकांत दमदार खेळ करत असताना पुढच्या दहा षटकांत मात्र सातत्य राखता आले नाही, आता उपांत्य फेरीसाठी यात निश्‍चितच सुधारणा करावी लागेल, असे हरमनप्रीतने सांगितले. गोलंदाजीतही आम्ही कधी फारच चांगली कामगिरी केली; तर कधी पकड गमावली, अशा चुका महागात पडू शकतात, असेही हरमनप्रीतने स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News