युवकांनी बुद्धीच्या जोरावर व्यावसायिक व्हावे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

भारत हा युवकांचा देश आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी आपल्यातील कलागुणांसह बुद्धीच्या जोरावर व्यावसायाची कास धरावी, असे मत फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी व्यक्त केले.

जळगाव : भारत हा युवकांचा देश आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी आपल्यातील कलागुणांसह बुद्धीच्या जोरावर व्यावसायाची कास धरावी, असे मत फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी व्यक्त केले. प्रधानमंत्री जिल्हास्तरीय मुद्रा योजना समन्वय व प्रचार समितीतर्फे यावल तालुकास्तरीय मेळावा नुकताच तापी व्हॅली एज्युकेशन सोसायटीचे धनाजीनाना महाविद्यालयात झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, पंचायत समिती सदस्य कलिमा तडवी, सर्फराज तडवी, योगेश भंगाळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार जितेंद कुंवर, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी, धनाजीनाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर चौधरी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्याधर, डांभुर्णीचे सरपंच पुरजीत चौधरी, जिल्हा नियोजन कार्यालयाचे जोशी, श्री. सूर्यवंशी उपस्थित होते. 

जिल्हा माहिती अधिकारी बोडके यांनी प्रास्ताविकात प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती विशद केली. तहसीलदार जितेंद्र कुंवर, श्री. संदानशीव, श्री. विद्याधर डांभुर्णीचे सरपंच चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्याच्या ठिकाणी शासनाच्या विविध विभागाच्या माहितीचे स्टॉल लावले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News