कोकणातील तरुणांनी ऑनलाईन शिक्षणासाठी बनवल एक भन्नाट अँप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
  • कोरोना वायरसचा संसर्ग वाढत असल्यामुळे देशात सर्व ठिकाणी १६ मार्च पासून शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आली होती.
  • त्यानंतर आजतागायत शिक्षण संस्था पुन्हा प्रत्यक्षात कधी सुरु होतील याबद्दल कोणी सांगू शकत नाही.
  • शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता ऑनलाईन वर्ग भरवण्याचे आदेश दिले.

रत्नागिरी :- कोरोना वायरसचा संसर्ग वाढत असल्यामुळे देशात सर्व ठिकाणी १६ मार्च पासून शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आली होती. त्यानंतर आजतागायत शिक्षण संस्था पुन्हा प्रत्यक्षात कधी सुरु होतील याबद्दल कोणी सांगू शकत नाही. शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता ऑनलाईन वर्ग भरवण्याचे आदेश दिले. शहरातील विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन डिजिटल माध्यमातील शिक्षण घेणं काही प्रमाणात सोप्प आहे. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र सोयी सुविधांचा अभाव असल्याने हे ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य होत नाही. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील  दोन तरुणांनी या समस्येवर उपाय शोधून एक भन्नाट अँपची निर्मिती केली आहे. सिद्धार्थ पात्रे आणि सौरभ सुर्वे या दोन इंजिनिअर असलेल्या मित्रांनी देशात असलेली ऑनलाईन पद्धत आणि त्यामध्ये येत असलेल्या समस्या यांचा विचार करून क्लेवर ग्राउंड हे अँप तयार केले आहे. या दोघांचे प्राथमिक शिक्षण हे कोकणातील त्यांच्या मुळगावी झाले असून पुढील उच्च शिक्षण त्यांनी मुंबई, पुणे आणि अमेरिकेत पूर्ण केले आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत ह्या तरुणांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील शिक्षण पद्धती ही फार प्रगत आहे परंतु भारतातील विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचा अभाव असल्याने ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होत नाही. म्हणून भविष्याचा विचार करून या तरुणांनी क्लेवर ग्राऊंड ह्या अँपची  निर्मिती केली. ह्या अँपच वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाईन वर्ग सुरु असताना विद्यार्थ्यांच्या इंटरनेट कनेक्टिविटी मध्ये अडथळा निर्माण झाल्यास विद्यार्थ्याला ते लेक्चर ऑफलाईन डाउनलोड करून पाहता येऊ शकेल.  तसेच ह्या अँप मार्फत शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासा संबंधातील नोट्स, गृहपाठ देऊ शकतात. विद्यार्थ्यांना शिकवलेला पाठ समजला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी शिक्षक ह्या क्लेवर ग्राउंड अँप मार्फत एक प्रश्नावली तयार करून  विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे तपासू शकतात. 

रत्नागिरी शहरातील शाळा तसेच कोचिंग क्लासेस मध्ये हे अँप सध्या वापरले जात आहे. ऑनलाईन शिक्षण घेत असताना सध्या वापरात असलेल्या काही अँप्सच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु क्लेवर ग्राउंड हे अँप पूर्णता सुरक्षित असून ह्याचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मेल आयडी आणि पासवर्ड दिला जातो. कोकणातील उच्च शिक्षित तरुणांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी बनवलेले हे अँप विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खूप उपयोगी ठरत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News