औरंगाबाद : समाजात घडणाऱ्या चांगल्या तसेच वाईट घटना, विसंगती समाजासमोरच मांडण्याचे काम सिनेमा करीत असतो. त्यामुळे सिनेमा हा तसा सर्वांचाच आकर्षणाचा विषय असतो. येथील रसिकांची भूक लक्षात घेऊन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला तरुणाईनी गर्दी केली आहे.
#पहिल्यांदाच वेगवेगळ्या भाषेतील विषयांचे चित्रपट पाहायला मिळत आहेत. यापूर्वी हा चित्रपट महोत्सव बघण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. यावर्षी महोत्सवातील चित्रपट पाहून अनेक नवनवीन गोष्टी जाणून घेता आल्या. त्यासोबतच एका चित्रपटामागील प्रत्यक्ष पार्श्वभूमी काय असते, याची माहिती मिळाली. अनेक कलाकार, दिग्दर्शकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी या चित्रपट महोत्सवाने दिली.
#मला एआयएफएफमुळे खूप काही शिकायला मिळाले. विविध भाषा आणि प्रांतातील उत्तम अणि बोधकार्य तसेच सामाजिक, राजकीय, आर्थिक पातळ्यावरचे भिन्न बाबी मांडणारे चित्रपट पाहण्यास मिळाले. भाषा, धर्म आणि संस्कृतीमधील दरी कमी करण्यासाठी आणि नावीन्यपूर्ण कन्टेंट असलेले चित्रपट लोकांसमोर पोचवण्यासाठी ए.आय.एफ.एफ हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे.
#हा चित्रपट महोत्सव पहिल्यांदा अनुभवला. या शहराने कायम ऐतिहासिक वारसा जपला आहे. असे उपक्रम राबवत कलारसिकांसाठी एक पर्वणी आहे. त्याचप्रमाणे या पाचही दिवसांत विविध भाषांतील चित्रपट पाहण्याची एक चांगली संधी आहे.
#चाळीस जागतिक दर्जाचे चित्रपट एकत्रित पाहण्याचा योग सातव्या औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. त्यामुळे आमच्यासारख्या चित्रपटप्रेमींसाठी सुवर्णसंधी आहे. चित्रपट हा मनोरंजन म्हणून न बघता त्यातील बारकावे समजून घेतले पाहिजे. अनेक मोठे कलाकार, अभ्यासक या महोत्सवाला येत आहेत. त्यामुळे चित्रपट हा विषय अधिक जाणून घेता येत आहे. हा अनुभव नक्कीच अनुभवी असेल.
#अंधाधुन चित्रपटात सकारात्मकसोबतच नकारात्मक पात्रातील संवेदनशीलता देखील दाखवली आहे. थ्रिलिंग चित्रपटात गती महत्त्वाची असते आणि ती मेन्टेन करणे अवघड असते. तसेच अशा चित्रपटात ती कशी मांडावी हे या चित्रपटातून कळते आणि संगीतदेखील उत्तम आहे. नायकाच्या अभिनयातून अभ्यासपूर्वक भूमिका पार पाडण्याची जाणीव होते.
#उद्घाटन समारंभ खूप छान पार पडला. पहिल्या दिवशी दाखवलेला हेल्लारो गुजराती चित्रपट मी पाहिला. अगदी उत्तम चित्रपट आहे. आणि गुजराती चित्रपटाला सुवर्णपदक मिळालेला पहिलाच गुजराती चित्रपट हेल्लारो आहे. चित्रपटातील शूटिंग, फोटोग्राफीदेखील उत्तम आहे. गुजराती भाषा पूर्ण समजत नसल्याने सबटाईटल्समुळे चित्रपट अधिकच कळला.
#आज फेस्टिव्हलमध्ये मी ‘उंगा ॲस्ट्रिड’ व जलीकट्टू’ असे दोन चित्रपट पाहिले. सुरवातीला ज्याप्रकारे राष्ट्रगीत, नंतर चित्रपटाची थोडक्यात ओळख करून दिली जाते. चित्रपट संपल्यानंतर काही प्रश्नोत्तरे घेतली जातात असा छान अनुभव आज घेता आला. उत्तम मॅनेजमेंट आणि खूप छान फेस्टिव्हल बघायला भेटला.