लातुरात रंगणार तरुणाईचा नाट्याविष्कार 

सुशांत सांगवे
Monday, 18 February 2019

राज्याच्या वेगवेगळ्या भागात कशाप्रकारे नाटक सादर होत आहे, तरुण पिढी हा कलाप्रकार किती ताकदीने पेलत आहे, ती यात नवनवे प्रयोग किती कौशल्याने करत आहे, हे लातूरातील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पुढाकार घेतला असून त्यांच्या वतीने लातुरात महाएकांकिका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

महाएकांकिका महोत्सव;

ठिकठिकाणच्या सर्वोत्कृष्ठ एकांकिकांंची मेजवानी

लातूर :  कलावंतांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील कलागुण विकसित व्हावेत म्हणून राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुरूषोत्तम करंडकसह वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. अशा वेगवेगळ्या स्पर्धांत प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या निवडक एकांकिकांचा महाएकांकिका महोत्सव सांस्कृतिक कार्य संचालनालयाने लातुरात आयोजित केला आहे.

तो १९ आणि २० फेब्रुवारी रोजी दगडोजी देशमुख सभागृहात सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळात होणार आहे. अमरावतीतील स्यमंतक संस्थेचे ‘रूबरू’, मुंबईतील महर्षी दयानंद महाविद्यालयाची ‘तुरटी’, नगरमधील प्रेमराज सारडा महाविद्यालयाची ‘पीसीओ’ या तीन एकांकिका महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (ता. १९) सादर होणार आहेत.

तर दुसऱ्या दिवशी मुंबईतील रंगोदय रुपांतर संस्थेचे ‘रवंथ’, नागपूरमधील धनवटे नॅशनल महाविद्यालयाची ‘गटार’, डोंबिवलीतील स्वामी नाट्यांगण संस्थेची ‘बी फोर द लाईन’ ही एकांकिका सादर होणार आहे. या महोत्सवानिमित्ताने हाॅटेल श्री येथे दोन दिवसांची नाट्य कार्यशाळाही होणार आहे. यात विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे, असे संचालनालयाच्या वतीने सांगण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News