समाजातील तरुणांनी देशाच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 January 2020

विविध क्षेत्रात काम करीत समाजात वेगळा ठसा निर्माण करणाऱ्यांनी समाजासाठी वेळ द्यावा. विशेषतः समाजातील तरुणांना उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देण्याची गरज असून त्यांना व्यासपीठ  निर्माण करून द्यावे,

नागपूर : चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील व्यक्तींनी मोठ्या पदावर काम केले. विविध क्षेत्रात काम करीत समाजात वेगळा ठसा निर्माण करणाऱ्यांनी समाजासाठी वेळ द्यावा. विशेषतः समाजातील तरुणांना उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देण्याची गरज असून त्यांना व्यासपीठ  निर्माण करून द्यावे, असे आवाहन मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष आणि सीकेपी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी केले. 

अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्था व सीकेपी सभा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात १८ व्या समाज उन्नती  परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या दोनदिवसीय परिषदेचा समारोप आज झाले. या परिषदेतील उद्योजक मेळाव्यात गुप्ते बोलत होते. 

यावेळी समाजाच्या प्रगतीसाठी विविध ठराव पारित करण्यात आले. उद्योजक मेळाव्याला निवृत्त वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस, वायुसेनेचे के. सुधीर, सुमंत मथुरे, निनाद जयवंत, विष्णू पाटील आदी उद्योजक उपस्थित होते. गुणवत्तेची आज देशाला गरज आहे. कायस्थांनी देशाच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा. दुर्बल समाजबांधवांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी निवृत्त वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस यांनी केले. आपल्या पूर्वजांचा वारसा श्रीमंत असून तो सर्वांनी जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उद्योजक मेळाव्यापूर्वी महिला मेळावा पार पडला.

या मेळाव्यात अभिनेत्री आसावरी जोशी, अमृता कारखानीस, विशाखा गुप्ते, वैजयंती गुप्ते आदी महिलांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव कथन केले. वैजयंती गुप्ते या गुजरातमध्ये समाजातील गरीब महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करीत आहेत. तेथील अनुभव सांगताना त्यांनी समाजातील महिलांप्रती जबाबदारीची जाणीव करून दिली. युवक मेळाव्यात विविध क्षेत्रातील यशस्वी तरुणांनीही यावेळी त्यांचे अनुभव सांगितले. उदय गडकरी यांनी तरुणांना सामाजिक उपक्रमाशी जोडण्याचे आवाहन केले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News