'कशी' असते ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया; जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 February 2020
  • या क्षेत्रात प्रवेश करायचा, तर किमान दहावी-बारावी पास असणं आवश्यक आहे. दहावीनंतर डिप्लोमा कोर्स करता येतो, तर बारावीनंतर डिग्री कोर्स करणं शक्य आहे.

सध्याची तरुणाई प्रत्येक गोष्टीचा चौकसपणे विचार करणारी आणि आपल्या करियरबाबतीत जागरूक असते. आपल्या मनाला जे पटेल आणि जे आवडेल त्याचा चारही बाजूंनी विचार केला जातो आणि आपल्याला नक्की काय करायचं आहे हे ठरवलं जातं. पालक सांगतायत म्हणून वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण घेण्यापेक्षा आपला कल कशात आहे हे ओळखून स्वत:साठी करियर निवडलं जातं. कला क्षेत्राकडे बऱ्याच जणांचा ओढा असतो. त्यातल्या वेगवेगळ्या वाटा तरुणाईला खुणावत असतात. त्यातल्याच ज्वेलरी या क्षेत्रात करियर कशा प्रकारे होऊ शकेल

या क्षेत्रात प्रवेश करायचा, तर किमान दहावी-बारावी पास असणं आवश्यक आहे. दहावीनंतर डिप्लोमा कोर्स करता येतो, तर बारावीनंतर डिग्री कोर्स करणं शक्य आहे. ग्रॅज्युएशननंतर शॉर्ट टर्म कोर्सेसही करता येतात. भारतातील अनेक संस्थांमध्ये ज्वेलरी डिझायनिंगचे लाँग टर्म, शॉर्ट टर्म तसंच, डिस्टन्स प्रोग्रॅम्स (दूरस्थ शिक्षण पद्धतीचे) उपलब्ध आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News