तुझ्या मिठीतल्या आठवणी

धनश्री पाईकराव
Tuesday, 12 February 2019

प्रेम माझं तुझ्यावरचं 
कोणत्याचं शब्दांत मांडणार नाही 
तुला मिठीत घेताच कळतं की 
आता त्याचीही गरज भासणार नाही

हग डे म्हणजे मराठीत भेटीचा दिवस (आलिंगन) असे म्हणतात. गळा भेट दिल्याने माणसातील नाती ही पक्की होतात. जेंव्हा आपण एखाद्या व्यक्तिला खूप दिवसांनी भेटतो तेंव्हा आपण त्या व्यक्तीला मिठी मारतो. त्यावेळेला आपलाला खूप आनंद होतो.

हग आपण आपल्या  जवळच्याच माणसाला करू शकतो, जसं कि आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, आपला जोडीदार. कारण आपल्याला माहित असते कि, आपल्याला कोणत्याही गोष्टीचे दुःख झाले, तरी आपली जवळची माणसं आपल्याला मिठीत घेऊन मनातले दुःख विचारून आपले दु:ख हलकं करत असतात.

आपण ज्यावेळी आपल्या जवळच्या जोडीदाराच्या मिठीत राहून आपण दिवसभरातील घडलेल्या गोष्टी त्याला सांगतो, त्यावेळी सगळं काही विसरून जातो. त्यावेळेला डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारख वाटतं, त्यामुळे आपल्याला त्या माणसांची जवळीक वाटायला लागते. जे आपल्याला वेळोवेळी समजून घेत    असतात.

आपण आपल्या प्रियकराला कधीही मिठी मारतो; पण हग डेला मिठी मारणे, हे त्या दिवशी वेगळंच फीलिंग आणून देतं. कारण मिठी मारताना त्यांच्यामधील संवाद त्यावेळी खूप छान होत असतो.

HUG

 एक बार गले लग कर, 
मेरे दिल कि धडकन सुन,
फिर वापस आने का इरादा, 
हम तुमपे छोडते हे.

प्रेम माझं तुझ्यावरचं 
कोणत्याचं शब्दांत मांडणार नाही 
तुला मिठीत घेताच कळतं की 
आता त्याचीही गरज भासणार नाही

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News