कॉफी ने उजळा तुमचा  चेहरा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 3 October 2019

कॉफी हा असा नैसर्गिक घटक आहे,ज्याने तुमच्या चेहऱ्याची त्वचा नितळ व्हायला मदत होते.

आताच्या जगात स्त्रिया,मुली ह्या स्वतःच्या तब्येतीला घेऊन फार काळजीत असतात. नवनवीन सौन्दर्य प्रसाधने वापरून आपला चेहरा आणि आपली त्वचा सांभाळत असतात. घरगुती उपाय करण्यावर महिलांचा भर जास्त असतो. मग कोणी दूध-हळद-साय , कोणी मुलतानी मातीचा लेप लावते, कोणी रेग्युलर सलोन मध्ये जाऊन स्वतःला अपडेट करत असतात.परंतु रोज पिणारे कॉफी ही सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी उपयोगी आहे. जसे कॉफी प्यायल्याने तरतरी येते तसेच ती आपले सौन्दर्य खुलवण्यास मदत करते  

 सौंदर्य खुलवण्यासाठी कॉफीचा  वापर हा  कॉफीच्या बिया कुटून त्यापासून तयार केलेल्या पावडरचा स्क्रब म्हणूनही वापर करता येतो. कॉफी हा असा नैसर्गिक घटक आहे,ज्याने तुमच्या चेहऱ्याची त्वचा नितळ व्हायला मदत होते. कॉफीमध्ये असणारे कॅफेन त्वचेचा निस्तेजपणा घालवण्यास मदत करतो.कॉफीमुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते. अतिनिल किरणांमुळे त्वचेची झालेली हानी ही कॉफीमुळे भरून निघण्यास मदत होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News