व्हॉट्सअँप चॅटला वैतागून युवकाने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

जितच्या कॉलेजमधील मित्रांनी ‘नमुने’ या नावाने एक व्हॉट्‌सॲप ग्रुप बनविला होता. 

नालासोपारा : वसईत इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. व्हॉट्‌सॲप ग्रुपमधील मित्रांनी पाठवलेल्या आत्महत्येच्या मेसेजेसनी प्रवृत्त होऊन त्याने आत्महत्या केल्याची तक्रार तरुणाच्या वडिलांनी केली आहे.  या तरुणाचे नाव जित असर असे असून तो सांताक्रूझ येथील रहेजा कॉलेजमध्ये बीएमएमच्या प्रथम वर्षात शिकत होता. 

शुक्रवारी  त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी त्याचा मोबाईल तपासला असता कॉलेजच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपमधील मेसेजेसमुळेच जितने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जितच्या कॉलेजमधील मित्रांनी ‘नमुने’ या नावाने एक व्हॉट्‌सॲप ग्रुप बनविला होता. 

त्यात सर्व मित्र मस्तीमध्ये जित याला चिडवत होते. त्यालाच प्रवृत्त होऊन जितने आत्महत्या केली असल्याचा आरोप जितच्या वडिलांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रारदेखील केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News