कंटेनरला धडक लागून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

प्रशांत इस्लामपूर पालिकेत हंगामी कर्मचारी म्हणून सेवेत होता. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त झाली. इस्लामपूर पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.

वाळवा : रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या मोकळ्या ट्रॉलीला धडकल्याने येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. प्रशांत सुरेश मेटकरी असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्रशांत इस्लामपूर पालिकेत हंगामी कर्मचारी म्हणून सेवेत होता. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त झाली. इस्लामपूर पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत मेटकरी हा रात्री आठच्या सुमारास इस्लामपूरकडे दुचाकीने निघाला होता. या रस्त्यावर आडवा दंड परिसरापासून एक किलोमीटरवर त्याची दुचाकी ट्रॅक्‍टर ट्रॉलीला धडकली. ट्रॉली अंधारात उभी करण्यात आली होती.तिच्यावर क्रमांक नव्हता. रिफ्लेक्‍टरही नव्हते. त्यामुळे प्रशांतला ट्रॉली दिसली नाही. दुचाकीची थेट धडक झाल्यावर प्रशांत रस्त्यावर पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

आष्टा पोलिस दाखल झाले. मात्र, अपघात इस्लामपूर हद्दीत असल्याने इस्लामपूर पोलिसांना कल्पना देण्यात आली. इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. प्रशांतच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. प्रशांतचे आई-वडीलमोलमजुरी करतात.नोकरीच्या शोधात असलेल्या प्रशांतला काही दिवसांपूर्वी इस्लामपूर पालिकेत हंगामी नोकरी मिळाली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News