आतिशय शांत स्वभावाचा असणारा रमेश, नेहमी सर्वांसोबत हसत खेळत आसायचा. त्याचं शिक्षण जेमतेम 8-9वीपर्यंत झालेलं. लहानश्या खेडेगावात एका शेतकरी कुटंबातला. त्याचं वय 18 वर्ष असेल.

त्याची शाळा लवकर बंद झाली. शिक्षणाची आवड नसल्यामुळे त्याने लवकरच शाळेला राम-राम केला. त्याला शेतीची खूप आवड होती. सगळ्यांसोबत मिळून-मिसळुन राहायचा. शेतीतली कामेही तो उत्तम करायचा.

असं म्हणतात, प्रेमाला वय नसतं, त्याचप्रमाणे त्याच्या आयुष्यात प्रेमाने एंट्री मारली. प्रेमाच्या बाबतीत काहीही न माननारा रमेश, मात्र कधी प्रेमात पडला, त्यालाही कळाल नाही. आनखी लग्नाच वयही झालं नव्हतं मात्र. त्याला याचं काही घेन-देंन नव्हतं आणि त्यातलं विशेष म्हणजे गावाकडे मुलींचे लग्न लवकर होतात. त्याचप्रमाणे त्याच्याही प्रेयसीचे लग्न वयाच्या सोळाव्या वर्षीच ठरलं.

इकडे प्रेमाला सुरवात नूकतीच झाली होती आणि तिकडे तिचं लग्नही जमलं होतं. तिने रमेशला फोन करुन सांगीतलं. माझं लग्न ठरलंय; पण मला तुझ्याशीच लग्न करायच आहे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. लवकर काहीतरी करावं लागेल. आपण कुठेही जाऊ... जगायचं तर सोबतंच आणि मरायचं तर सोबतंच. इकडे याचाही जीव लागत नव्हता. काही दिवस झाले कोणत्याही कामात मन रमत नव्हतं आणि तो बेचैन झाला होता.
मुलगी सोयऱ्यातलीच आसल्यामुळे काहीतरी काम काढून तो, तिच्या घरी तीला भेटायला गेला. दोघांनीही ठरवलं की, आता काहीतरी मार्ग काढलाच पाहीजे. त्याने आपल्या घरी तिच्याबद्दल सांगितलं परंतू घरच्यांनी मात्र त्याला साफ विरोध केला. मात्र प्रेमात सगळं चालतं. त्याचप्रमाणे त्यांनीही ठरवलं होत की, आता आपल्याला कुठेतरी बाहेर जावं लागेल.

जिथे आपल्याला विरोध करणारे कोणीही नसेल. ठरल्याप्रमाणे त्याने पुण्याला राहणाऱ्या त्याच्या अतिशय विश्वासू भावाला सांगीतलं, की आम्ही दोघे येत आहोत. योग्य त्या वेळी दोघेही आपल्या घरातून निघून गेले. कधीही कुठेही न फिरणारा रमेश प्रेमाच्या परिक्षेत मात्र सगळं, अगदी सहज पार करत होता. त्याच्या प्रेयसीची त्याला आसलेली साथ त्यामुळे त्याचा आत्मविश्वास खूप ऊंच झाला होता.
कोणत्याही जवळच्या मित्राला न सांगता पुण्याच्या दिशेने ते दोघेही कशाचीही परवा न करता निघाले होते. इकडे घरच्यांचा रमेश अतिशय लाडाचा होता. सगळ्यांचा त्याच्यावर जीव होता. दोन-तीन दिवस झाले होते, तो घरी आला नसल्यामुळे सगळ्यांचा जीव कासाविस झाला होता. अचानक त्याचा फोन आला आणि आई-वडीलांच्या जीवात जीव आला. त्याला सगळ्यांनी परत येण्यास सांगितलं. परंतू त्याची एकच अट होती.

जिच्यासाठी मी इतपर्यंत आलोय तिला सोबत घेऊन येणार. कारण त्यांनी एकमेकांसोबत जगण्या मरन्याचा निश्चय केला होता. एवढ्या लहान वयात एवढी समज ही प्रेमामुळे आली असेल असच म्हणावं लागेल. शेवटी सर्वांनी होकार दिला. ते दोघेही गावाकडे परत आले. सर्वांना आनंद झाला.
वयाने जरी लहान असले तरी समज ही महत्वाची आहे आणि प्रेमापुरती का होईना, त्याला नक्की आली असेल. हे मात्र खरं. वय लहान असलं तरी प्रेमात मात्र ते दोघेही खूप मोठं होते, हे नक्की.