मुलं त्यांच्याहून वयाने मोठ्या असलेल्या मुलींच्या प्रेमात का पडतात? जाणून घ्या कारणे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 18 September 2019

प्रेम आंधळं असते असं म्हटलं जाते त्यामुळे प्रेमाला वयाचं आणि वेळेचं बंधन नसते. या गोष्टी अनेकांना पटत नसतात त्यामुळे अनेकदा मोठा विरोध सुद्धा होतो. पण ज्यांनी खरं प्रेम केलंय ते  काहीही झाले तरी एकत्र येतातच. आजकालचे मुलं त्यांच्याहून वयाने मोठ्या असलेल्या मुलींच्या प्रेमात पडतात. नेमकं वयाने मोठे असलेल्या मुलीच्या प्रेमात मुलं का पडतात? याचे कारणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नात्याला प्राधान्य देणं- आयुष्यात नात्यापेक्षा जास्त मोठं काहीच नाही याची वयाने मोठ्या मुलींना पूर्ण कल्पना असल्यामुळे त्या प्रत्येक नात्याचा गांभिर्याने विचार करतात. नात्यासाठी असणारी त्यांची प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. अधिक वयाच्या मुलींसाठी नाती फार महत्त्वाची असतात. त्यामुळेच मुलं अनेकदा त्यांच्याहून वयाने मोठ्या असलेल्या मुलीकडे आकर्षित होतात.

गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून घेणं- कमी वयाच्या मुलांपेक्षा जास्त जग पाहिल्याने वयाने मोठ्या असलेल्या मुलींमध्ये गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची समज असते. वाईट परिस्थितीतही भांडणाशिवाय शांतपणे बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.

आत्मविश्वास असणं- वयाने मोठ्या असलेल्या मुलींमध्ये आत्मविश्वास फार असतो. या आत्मविश्वासाच्या जोरावरच त्या आयुष्यात अनेक गोष्टी मिळवतात. त्यांच्या हिंमतीच्याही प्रेमात मुलं पडतात.

भावनिकरित्या मजबूत- वयाने मोठ्या मुली या भावनिकरिक्ताय जास्त मजबूत असतात. ते आपल्या पार्टनरला कठीण काळात भावनिकरित्या आधार देतात. पुरुषांनाही भावनिकरित्या खंबीर असणाऱ्या महिला आवडतात.

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News