हा तरूण वस्ताद तयार करतोय कुस्तीतले मल्लं

महेश घोलप
Monday, 17 August 2020

हा तरूण वस्ताद तयार करतोय कुस्तीतले मल्लं

हा तरूण वस्ताद तयार करतोय कुस्तीतले मल्लं

गावाकडं कुस्ती म्हटलं की अनेकांच्या अंगात आजही एक वेगळा उत्साह संचारतो. माती, मैदान, बुध्दीमत्ता, ताकद याचा मिलाप आपल्याला कुस्तीतून पाहायला मिळतो. तांबड्या मातीत शरीर रगडून अनेक पैलवानांनी आपल्या नावावर अनेक किताब केले. पण असंख्य पैलनाव तयार करण्याचं काम जिद्दीने आणि मेहनतीने तयार करतोय. तरूण वस्ताद राहूल जाधव...

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील खेड्यात राहणा-या तरूणासाठी शहरातल्या सारखा एक आखाडा व्हावा असं स्वप्न कुस्ती खेळत असताना राहूल जाधवने पाहिलं होतं. राहूलने पहिल्यांदा घरच्यांना आखाड्याबाबत कल्पना दिली. वडिल मिल्ट्रीत निवृत्त, एक बंधू मिल्ट्रीत असल्याने घरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर राहूलने जागा आणि आर्थिक गोष्टींमध्ये लक्ष घातलं, तिथंही सगळं जुळून येतंय हे लक्षात आलं.

सांगली जिल्ह्यातील 'शेडगेवाडी' हे गाव पैलवानांच्या प्रशिक्षणासाठी निवडण्यात आलं. हे गाव सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवासासाठी अत्यंत सोईस्कर आहे. तिथं गावक-यांच्या मदतीने राहूल जाधवने दीडवर्षापुर्वी स्वत: च्या हिमतीवर कुस्ती आखाडा सुरू केला. भागातील अनेक तरूण मल्ल तिथे प्रशिक्षण घेण्यास होते आणि आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्हयातील अनेक मल्लं तिथं खास कुस्तीतलं प्रशिक्षण घेण्यास येतात.

ग्रामीण भागातल्या अनेक पालकांना आपल्या मुलाने कुस्तीत नाव कमवावे अशी इच्छा असते. परंतु खुराक तितका पुरवता येईल का ? या भीतीने अनेक पालकांची स्वप्न पुर्ण झालेली नाहीत. पण ग्रामीण भागात आखाडा असल्याने शहारातल्या आखाड्यापेक्षा ग्रामीण भागात खर्च कमी असतो. तसेच ग्रामीण भागातलं वातावरण तब्येतीला आणि बुध्दीमत्तेला अधिक पोषक असते. त्यामुळे ग्रामीण भागातल्या अनेक पालकांची इच्छा लवकरचं पुर्ण असं राहूल जाधव यांनी सांगितले.

कुस्ती क्षेञात कार्यरत असताना अनेक अडीअडचणींचा सामना करत मी माझ्या सहका-यांच्या मदतीने मल्लविद्या कुस्ती केंद्राची स्थापना केली. ग्रामीण भागातील गोरगरीब मल्लांना हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशाने सदर कुस्ती केंद्र स्थापन केले. ग्रामीण भागातील कुस्तीगीर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाला पदक प्राप्त कसे करतील याकडे सर्वप्रथम आमचे लक्ष आहे. निर्व्यसनी , बलदंड , सशक्त पिढी घडावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या माध्यमातून आम्हास सदर कुस्ती केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट उपलब्ध झाली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील मल्लांना आंतरराष्ट्रीय कुस्तीचा पुर्णपणे अभ्यास करता येऊ शकतो.

पै. राहुल जाधव
संस्थापक - मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी

राज्य उपाध्यक्ष - कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य (रजि.)

मल्लविद्या कुस्ती केंद्र ग्रामीण भागासाठी पर्वणीच आहे. या कुस्ती केंद्रात येणा-या काळात अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल घडतील यात शंका नाही. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे कुस्ती केंद्र हे महाराष्ट्र अव्वल दर्जाचं कुस्ती केंद्र आहे. खास बाब म्हणजे या कुस्ती केंद्रात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे याचा फायदा मुलांच्या भविष्यासाठी होणार आहे.....

पै. शहाजी साळुंखे
प्रसिध्दी प्रमुख -
कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य

तालमीच्या स्थापनेपासून मी वस्ताद राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. माझी इथं आल्यापासून खूपच प्रगती झाली आहे. आहार , मेहनत ,आराम आणि शिक्षण या गोष्टीकडे प्रामुख्याने इथं लक्ष  दिले जाते. खरोखरच नवोदित मल्लांनी मल्लविद्या कुस्ती केंद्रात प्रवेश घ्यावा.

पै. महेश पाटील

कुमार महाराष्ट्र चॅम्पियन (परळे निनाई  ता.शाहुवाडी)

सुरवातीपासूनच मी या केंद्रात सराव करत आहे. मला या कुस्ती केंद्रात आल्यापासून खुप मेहनत करण्याची सवय लागली. ध्येय कसं गाठायचं याचा मुलमंञच मला वस्ताद राहुल जाधव यांनी दिला आहे. निसर्गाच्या कुशीत असलेलं हे कुस्ती केंद्र माझे दुसरे घरच आहे. या ठिकाणी अनेक मल्ल सराव करतात .येथे सर्व मुलांवर वैयक्तिक लक्ष केंद्रित केले जाते. येणा-या काळात आंतरराष्ट्रीय स्तर गाठण्याकडे आमचा कल आहे.

पै.ओंकार जाधव
चिंचोली ता. शिराळा

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News