बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी तरुणीनं जाळली कार आणि मग...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020
  • एक्स बॉयफ्रेंडनं फसवणूक केल्यानंतर प्रचंड चिडलेल्या प्रेयसीने त्याची गाडी पेट्रोल टाकून जाळल्याची घटना नुकतीच घडली आहे.
  • प्रेयसीच्या वाढदिवसादिवशी ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

एक्स बॉयफ्रेंडनं फसवणूक केल्यानंतर प्रचंड चिडलेल्या प्रेयसीने त्याची गाडी पेट्रोल टाकून जाळल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्रेयसीच्या वाढदिवसादिवशी ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेत प्रेयसी सुध्दा भाजली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

ही घटना अमेरिकेतील असून प्रेयसीची फसवणूक झाल्याचे लक्षात येताचं, तिचा संताप अनावर झाला तिने समोर असलेली प्रियकराची गाडी पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्लॅन तयार केला. त्या पध्दतीने तीने गाडीवर पेट्रोल ओटले. पण पेट्रोल इतक्या जलद गतीने पेट घेते हे तरूणीला कदाचीत माहित नसावे कारण चिडलेल्या तरूणीने पेट्रोल ओतल्यानंतर तात्काळ आग लावली. लावलेल्या आगीत प्रेयसी सुध्दा होरपळली. शेजारी असलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी तिला तात्काळ तेथील स्थानिक रूग्णालयात दाखल केले. 

डेली मेलने हे वृत्त प्रसारित केले आहे, केली एस हायेस (Kelly S Hayes) असं फसवणूक झालेल्या प्रेयसीचं नाव आहे. फसवणूक झाल्यानंतर बॉयफ्रेंडला धडा शिकवायचा हे तीने डोक्यात ठेवले होते. केलेला प्लॅन तिच्या अंगावर उलटला. पण कार मात्र जळून खाक झाली आहे. 

सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून प्रेयसीच्या वाढदिवसादिवशी ही घटना घडली आहे. गाडीचं मोठं नुकसान झालं असून पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतलं आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News