किर्तनातून सामाजिक जनजागृती करणारी तरुणी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020

हजारो वर्षांपासून संत महात्म्यांनी किर्तनाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे काम केले. आजही अनेकजण कीर्तनाची परंपरा पुढे घेऊन जात असून बेळगावातील एक विद्यार्थिनीही कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्याचे काम करीत आहेत. युवा दिनानिमित्त किर्तनकार श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी यांची बातमीदार मिलिंद देसाई यांनी घेतलेली विशेष  मुलाखत.

बेळगाव: टिळकवाडी येथील बालिका आदर्श शाळेत इयत्ता 10 शिकणाऱ्या श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी हिने गेल्या काही वर्षांपासून मतदान जनजागृती, सामाजिक एकता, स्त्री भ्रुण हत्त्या यासह विविध विषयांवर कीर्तन करण्यास सुरुवात केली आहे. वारकरी नसताना किंवा कीर्तनाची परंपरा नसताना फक्त इतर लोकांनी सादर केलेले कीर्तन पाहून समाजाला जागे करण्यासाठी श्रेया हिने किर्तन करण्यास सुरवात केली आहे. तिच्या किर्तनावेळी वडगाव भागातील वारकऱ्यांची तिला साथ मिळत आहे. 

 

शहरात शिवजयंतीवेळी चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावेळी चित्ररथावर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून सामाजिक संदेश देण्यातही श्रेया आघाडीवर आहे. अत्यंत कमी वयात समाजाला जागृत करण्याचे काम हाती घेतलेल्या श्रेयाने विविध माहिती पटातही काम केले आहे. तसेच एकपात्री नाट्य स्पर्धेत सहभागी होऊन तिने बक्षिसे मिळविली आहेत. महाराष्ट्र विधान सभेवेळी मतदान जागृतीसाठी तिने केलेल्या कीर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्यानंतर तिला मुंबईत किर्तन करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. 

बडोदा येथील महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात तिला कला सादर करण्याची संधी मिळाली होती. यावेळी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तिचे कौतुक केले होते तिला विविध पुरस्कारानी गौरविण्यात आले असून आतापर्यंत मिळालेल्या सर्व पुरस्कारांची रक्कम गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वाटून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News