तरूणीने शार्कला दिले जीवदान, झाला व्हिडीओ व्हायरल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020

तरूणीने शार्कला दिले जीवदान, झाला व्हिडीओ व्हायरल 

समुद्रात शार्क पाहिला तर अनेकांची भंबेरी उडते, पण एका तरूणीने चक्क समुद्र किना-यावरच्या शार्कच्या शेवटीला पकडून समुद्रात खेचल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. शार्कला समुद्रात जाण्यास मदत करणा-या या तरूणीचे नेटक-यांनी अधिक कौतुक केलं आहे. 

शार्कला पडकण्याची कोणी सहजासहजी हिंमत करत नाही, तसेच शार्क दिसला तर त्याच्यापासून पळ काढणारी अनेक मंडळी आहे. पण तरूणीने केलेल्या कृत्याला अनेकांनी चांगलं म्हटलं आहे. किना-यावर आलेल्या शार्कला पाण्यात जाण्यास मदत करण्यासाठी तरूणीचे चक्क शार्कची शेपटी खेचली आणि शार्कला पाण्यात ढकललं. हा व्हिडीओ सोशल मीडिया वापरकर्त्यांना प्रचंड आवडला अनेकांनी तरूणीला मर्दानी, शेरणी आणि खरा हिरो असल्याचं म्हटलं आहे. 

इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावरती सुरूवातीला शेअर केला. त्यावेळी त्यांनी ‘सर्व शार्क खतरनाक नसतात. शार्कला वाचवण्यासाठी या मुलीने वेगळं काहीतरी केलं आहे, असं कॅप्शन लिहिलं आहे. समद्रात एकूण ५०० शार्कच्या जाती आहेत, त्यापैकी ३० प्रजाती फक्त मनुष्यावरती हल्ला करतात. सोशल मीडियावरती शेअर झालेल्या या २० सेकंदाच्या व्हिडीओला चांगली प्रसिध्दी मिळाली असून, अजून तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News