हा तरूण वस्ताद तयार करतोय ऑलिम्पीक दर्जाचे पैलवान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 19 September 2020

हा तरूण वस्ताद तयार करतोय ऑलिम्पीक दर्जाचे पैलवान

पैलवान हा शब्द उच्चारला की अनेकांच्या अंगात उत्साह संचारतो. मातीतलं हिरा म्हणजे पैलवान असं आपल्या कानावर अनेकदा पडलेलं असतं. महाराष्ट्रात फार पुर्वीपासून कुस्ती खेळली जाते. कुस्तीतले डावपेच जरी वेगळे असले तरी कुस्ती म्हणजे आयुष्य असं समजून जगणारे अनेक चाहते आज महाराष्ट्रात आहेत. आता कुस्तीला चांगले दिवस आले असं म्हणायला हरकत नाही. कारण पुर्वी ज्याच्या घरी खायला अधिक असायचं अशी पोरं तालमीत जायची. पण आज हे चित्र पालटलं आहे. शरीरयष्टी चांगली राहते, ते महत्त्वाचं असल्याने अनेक तरूण ग्रा्मीण भागात तालमीत जाऊन व्यायाम करतात. महाराष्ट्रातल्या मातीने आत्तापर्यंत अनेक चांगले पैलवान दिले. त्याचबरोबर त्यांना मानसन्मानही मिळाला. परंतु अनेक पैलवान शहरात जाऊन घडले. कारण ग्रामीण भागात तशी तालमीची व्यवस्था नव्हती. पण ग्रामीण भागात असे पैलवान घडावे य़ासाठी राहूल जाधव नावाचा वस्ताद मागच्या वर्षीपासून प्रयत्न करतोय. त्याला काही प्रमाणात यशही आलंयअसं म्हणायला हरकत नाही.

आपल्या भागातल्या मुलांना शहरात जावं लागतं. तिथं अधिक खर्च येतो ही समस्या राहूल जाधवच्या डोक्यात कुस्ती खेळत असताना आली. मुळात तो पैलवान असल्यामुळे ग्रामीण भागातल्या कुस्ती आखाड्यात जाऊन व्यायाम करायचा. आजूबाजूची जत्रा असली की तिथं कुस्ती खेळणं, व्यायाम करणं आणि शिक्षण असं राहूलचं ठरलेलं होतं. राहूलच्या घरातही व्यायामाची आवड होती. कारण गावात घरटी पैलवान असल्याने राहूलचा व्यायामाकडे पाहाण्याच कल वेगळा होता. वडील मिल्ट्रीत होते. आता ते सेवानिवृत्त असून घरच्या शेतात रमलेत. तसेच मोठे बंधू सुध्दा पैलवान होते, पण मिल्ट्री भरती झाल्यानंतर ड्यूटीवरती गेले. घरचं सगळं व्यवस्थित असल्याने राहूलला व्यायाम आणि शाळा या दोन्ही गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करायला सांगितलं होतं.

ज्यावेळी राहूल कुस्ती खेळण्यासाठी बाहेर गावी जात असे, तेव्हा त्याच्या लक्षात असे आले की, शहरातल्या किंवा चांगल्या आखाड्यातले पैलवान अधिक तयारीचे असतात. त्यावर त्याने शाळेत असताना विचार करायला सुरूवात केली. विचार करत असताना आपण गावाकडं असं का करू शकत नाही असं राहूलच्या डोक्यात येऊ लागलं. ही गोष्टी त्याने कुस्तीतल्याा जाणकारांना सांगितली. त्यांनी त्यावर राहूलला सल्ले दिले. आपल्या भागात आखाडा काढायचा असं राहूलच्या डोक्यात पक्कं झालं. त्यानंतर राहूलने ही गोष्ट घरच्यांना सांगितली. घरच्यांनी या गोष्टीला तात्काळ होकार दिला. कारण घरात व्यायामाचं महत्त्व माहित असल्याने नकार देणार नाहीत याची कल्पना राहूलला होती.

शहरात जाऊन तिथल्या कुस्ती आखाड्याची राहूलने माहिती घेतली. अनेक कुस्ती संघटकांच्या मुलाखती घेतल्या, त्यातून त्यांनं कुस्ती आखाड्यासाठी काय महत्त्वाचं आहे यावर विचार करू लागला. फायनल झाल्यानंतर राहूलने जागा शोधण्यास सुरूवात केली. जागा शोधत असताना ती मोक्याची असावी. तसेच तिथं कुस्ती आखाड्यामुळे कुणाला त्रास होऊ नये, तसेच लोकांचा त्रास आखाड्याला होऊ नये अशी जागा शोधण्याचं सुरू असताना. त्यांना एक मोक्याची जागा मिळाली. त्या गावाचं नाव शेडगेवाडी...हे गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात येते. शेडगेवाडी हे गाव असं आहे की इथं तिन्ही जिल्ह्यातील पैलनाव येऊ शकतात. मुळात सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून इथं मुलं शिकायला येऊ शकतात. या हेतूने ही जागा निवडण्यात आली. इथं विशेष म्हणजे तिथून २०० मीटरच्या अंतरावरती शाळा आहे. जेणेकरून विद्यार्थ्यी शाळा संपल्यानंतर थेट कुस्ती आखाड्यात येऊ शकतो. जागा आणि इतर गोष्टींसाठी गावातल्या लोकांनप्रचंड मदत केली असं राहूलने सांगितलं.

जागा ताब्यात मिळवल्यानंतर काही कुस्ती शौकनांनी, तिथल्या गावक-यांनी तालिम बांधण्यास पैशाची मदत केली. तर काहींनी बांधकाम चालू असताना साहित्य दिले. बांधकाम करत असताना खर्चाची ८० टक्के बाजू राहूलने केली. कुस्ती आखाडा जसा पाहिजे होता तसा तयार करण्यात आला. त्यानंतर समोरच्या बाजूला म्हणजे अंगणात राहूलने पैलवानांसाठी मैदान तयार केलं. कुस्ती आखाडा तयार झाल्यानंतर त्याची चाचपणी सुरू झाली. कारण तिथं मुलं राहायला आली तर त्यांची सोय व्यवस्थित झाली पाहिजे.

राहूलला तोपर्यंत कुस्ती संघटक पदं मिळालं होतं. त्यामुळे राहूलची राज्यभर ओळख निर्माण व्हायला सुरूवात झाली. राहूलनं ग्रामीण भागात कुस्ती आखाडा काढल्याचे अनेकांना माहित झाले, त्यामुळे कुस्ती आखाड्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार होऊ लागला. चांगला दिवस पाहून राहूलने मान्यवरांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचं उद्घाटन केलं. शहरात जाणा-या मुलांना इथं तेचं कुस्तीतं ज्ञान मिळणार असल्याने भागातले अनेकजण आनंदीत झाले. तिथं भागातले पैलवान जमायला सुरूवात झाली. तिथं राहायला आल्यानंतर सुरूवातीच्या काही महिने गेले. जसं लोकांना माहित व्हायला सुरूवात जसं लोकं मुलांना तिथं पाठवण्यास सुरूवात केली. भागातले काही कुस्तीतं नावलौकिक मिळवलेले पैलवान तिथं व्यायाम करत असल्याने अनेकजण कुस्ती आखाडा पाहायला जाऊ लागले.

शहरातल्या आखाड्यात असलेल्या मुलाला अधिक खर्च असायचा, परंतु आल्यानंतर ५० टक्के खर्च होतोय. तो म्हणजे मुलाच्या खुराकाचे पैसे. राहूलने त्यांचा व्यायाम घ्यायला सुरूवात केली. सकाळी साडेतीनला मैदान सुरू व्हायचं. यामध्ये व्यायाम, खेळ असं असायचं. सकाळी त्यांच्या ठरलेल्या वेळेत सगळं व्हायचं. त्यानंतर दुपारी तीन वाजता व्यायामाला सुरूवात व्हायची तो व्यायामही त्यांच्या वेळेत संपायचा. काही महिन्यांनी मुलांच्या तब्येती चांगल्या झाल्या आणि जशी मुलं मैदान मारू लागली. तसा आमच्या तालमीचा प्रचार अधिक होऊ लागला. तिन्ही जिल्ह्यातून मुलं येऊ का अशी विचारू लागली.

त्यानंतर सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलं तिथं येऊ लागली. तिथं आलेल्या मुलाला योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने मुलंही खूश होऊ लागली. तिथं आलेल्या मुलाला व्यायामाचा प्रकार विनामुल्य आहे. त्याला फक्त तिथं राहिल्यानंतर खाण्याचा खर्च फक्त करावा लागतो. साधारण ३० मुलं सध्या तिथं कुस्तीतलं प्रशिक्षण घेण्यास आहेत. तसेच तयार झालेले पैलवान आणि राहुल तिथल्या मुलांना कुस्तीतले डावपेच शिकवणे आणि त्याअनुशंगाने व्यायाम करून घेणे एवढं करतात. तिथं गेलेल्या मुलाला शाळा शिकायची असल्यास बाजूला हायस्कूल आहे. तिथं आलेल्या मुलांचे पालक सुध्दा अधिक खूष आहेत कारण मुलांचा व्यायाम आणि शरीरयष्टी पाहण्यासारखी आहे असं त्यांचं मतं आहे.

तिथं आलेल्या प्रत्येक मुलाने कुस्तीमध्ये त्यानं नावलौकिक मिळवाव, तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळावे असा आम्ही त्यांच्याकडून व्यायाम करून घेता. मला खात्री आहे की सध्या असलेल्या ३० मुलांपैकी अनेक मुलं राष्ट्रीय पातळीवरती खेळतील असं राहूलने सांगितले.

मी पूर्वी कोल्हापूरला गंगावेश तालिमत होतो. तिथून मी बरेच डावपेच शिकलो. परंतु घरापासून लांब राहणं आणि तिथला खर्च पालकांना अधिक वाटायचा मी मागील वर्षभरापासून इथल्या आखाड्यात व्यायाम करतोय. इथला खर्च हा पालकांना परवडण्यासारखा इथं तुमच्या खुराकाला अधिक पैसे मोजावे लागत नाही. तसेच मी इथं आल्यानंतर महाराष्ट्र केसरी पदक मिळवलं आहे.  -  तात्या इंगळे, पैलवान

ग्रामीण भागातल्या अनेक पालकांना आपल्या मुलाने कुस्तीत नाव कमवावे अशी इच्छा असते. परंतु खुराक तितका पुरवता येईल का या भीतीने अनेक पालकांची स्वप्न पुर्ण झालेली नाहीत. पण ग्रामीण भागात आखाडा असल्याने शहारातल्या आखाड्यापेक्षा ग्रामीण भागात खर्च कमी असतो. तसेच ग्रामीण भागातलं वातावरण तब्येतीला आणि बुध्दीमत्तेला अधिक पोषक असते. त्यामुळे ग्रामीण भागातल्या अनेक पालकांची इच्छा लवकरचं पुर्ण असं राहूल जाधव यांनी सांगितले.

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News