आर्थिक संकटात अडकलेल्या गणेशमंडळांसाठी विघ्नहर्ता ठरला "हा" तरुण मूर्तिकार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020
  • पालघर जिल्ह्यातील नानिवली तालुक्यात राहणारा स्वप्नील नारायण घरत हा तरुण सध्या कोरोना काळात आर्थिक संकटात अडकलेल्या गणेश मंडळांकरीता विघ्नहर्ता ठरला आहे.
  • कोरोना काळात ईच्छा असूनही केवळ आर्थिक अडचण असल्याने गणेश उत्सव साजरा न करणाऱ्या गणेश मंडळांना मोफत गणेश मूर्तींचे वाटप करून मूर्तिकार स्वप्नील घरत या तरुणाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

कासा :- पालघर जिल्ह्यातील नानिवली तालुक्यात राहणारा स्वप्नील नारायण घरत हा तरुण सध्या कोरोना काळात आर्थिक संकटात अडकलेल्या गणेश मंडळांकरीता विघ्नहर्ता ठरला आहे. कोरोना काळात ईच्छा असूनही केवळ आर्थिक अडचण असल्याने गणेश उत्सव साजरा न करणाऱ्या गणेश मंडळांना मोफत गणेश मूर्तींचे वाटप करून मूर्तिकार स्वप्नील घरत या तरुणाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. स्वप्नील घरत ह्या तरुणाला लहानपणापासूनच रंगकाम करण्याची फार आवड होती. त्याने आपली आवड जोपासली आणि तो सध्या फिल्म सिटी मधील अनेक मालिका तसेच चित्रपटांचे सेट तयार करण्याचे काम करतो. स्वप्नीलने आजपर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांचे सेट तयार केले आहेत. स्वप्नीलने अजय देवगन निर्मित तानाजी या चित्रपटासाठी असिस्टंट आर्ट डिरेक्टर म्हणूनही काम पहिले.  

स्वप्नीलला रंग कामाची आवड आणि देवावर नितांत श्रद्धा असल्याने दरवर्षी आपल्या कामातून वेळ काढून तो गणेश मूर्ती बनवत असतो. दरवर्षी त्याला आजूबाजूच्या गणेश मंडळांकडून तसेच अन्य लोकांकडून गणेश मूर्तीच्या १५० ते २०० ऑर्डर मिळत असतात. परंतु यंदा कोरोनामुळे आर्थिक चणचण भासत असल्याने अनेक गणेश मंडळांनी यावर्षी गणेश उत्सव साजरा न करण्याचे ठरवले होते. परंतु अश्या गणेश मंडळांना मदत करण्याकरीता स्वप्नील घरत हा तरुण पुढे सरसावला आणि त्याने सोशल मीडियाद्वारे मोफत गणपती देण्याची जाहिरात केली.  सोशल मीडियाद्वारे करण्यात आलेली जाहिरात पाहून अनेक गणेश मंडळांनी स्वप्नीलशी संपर्क केला. यावर्षी स्वप्नीलने ६० गणेश मंडळांना मोफत गणेश मूर्ती देऊ केल्या. स्वप्नीलने केलेल्या या मूर्ती दानामुळे आर्थिक संकटात अडकलेल्या गणेश मंडळांनी यावर्षी आनंद उल्हासात गणेश उत्सव साजरा केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News