'या' कारणामुळे तरुण पोलिसाने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020
  • समाजातील आपलं कर्तव्य पार पाडत असताना स्वतःच्या कुटुंबाविषयी असणाऱ्या आपल्या कर्तव्यावर ते खरे उतरू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या खाजगी जीवनात अनेक अडचणी येत राहतात. साहजिकच या सर्व गोष्टींमुळे येणाऱ्या तणावाला त्यांना सामोरे जावे लागते. आणि याच तणावामुळे कधी कधी त्यांच्याकडून चुकीचं पाऊल उचललं  जातं. 

जळगाव : सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस नेहमीच तत्पर असतात. अगदी छोट्याशा चोरीपासून ते खुनापर्यंतच्या सर्व गुन्ह्यांचा छडा ते लावतात. आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही अवैध गोष्टीमुळे नागरिकांना त्रास होऊ नये याची जबाबदार त्यांच्यावर असते. आणि ही जबाबदारी ते अगदी चोख पार पाडत असतात. परंतु समाजातील आपलं कर्तव्य पार पाडत असताना स्वतःच्या कुटुंबाविषयी असणाऱ्या आपल्या कर्तव्यावर ते खरे उतरू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या खाजगी जीवनात अनेक अडचणी येत राहतात. साहजिकच या सर्व गोष्टींमुळे येणाऱ्या तणावाला त्यांना सामोरे जावे लागते. आणि याच तणावामुळे कधी कधी त्यांच्याकडून चुकीचं पाऊल उचललं  जातं. 

खाजगी आयुष्यातील तणावामुळे एका तरुण पोलिसाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये  हा प्रकार घडला असून त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या पोलिसाचं नाव पंकज मोहन पाटील असं असून तो चोपडा शहरातील पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांचं वय २७ वर्षे असून चोपडा शहरातील रिद्धीसिद्धी सोसायटीमध्ये ते एका भाड्याच्या खोलीत राहत होते. पंकज यांची घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने घरात सतत वाद आणि भांडण होत राहायचे.आणि याच सततच्या भांडणामुळे त्यांची पत्नीदेखील त्यांना सोडून माहेरी गेली.घरातील सततच्या या कलहामुळे शेवटी कंटाळून पंकज यांनी गळफास घेऊन आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं.  

जास्त वेळेच्या नोकरीमुळे आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही त्याचप्रमाणे कामामुळे येणार टेन्शन या सर्वांचा त्रास पोलिसांना सहन करावा लागत आहे. परिणामी त्यांचं मानसिक खच्चीकरण होत असून त्यांच्यातील आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. नागरिकांना सुरक्षा देणारेच सुरक्षित नाहीत ही अतिशय गंभीर समस्या आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News