तरुणाईला हवी नाईट लाईफ; नाईट लाईफ सुरू होईल की नाही ?

सकाळ (यिनबझ)
Sunday, 19 January 2020

येणाऱ्या 26 जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू होईल अशी जोरदार चर्चा रंगत होती पण अजूनही सरकारकडून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

मुंबई:  तरुणाई मंडळी प्रतीक्षेत आहेत ते म्हणजे नाईट लाईफच्या. पण  नाईटलाइफ सुरू होईल की नाही ? असा प्रश्न आता सर्व तरुण मंडळींना पडलाय.  त्याचं कारणही तसंच आहे,  राज्याचे गृहमंत्री आणि देशमुख यांनी चक्क नाईटलाइफ बाबत अनिश्चितता व्यक्त केली आहे. येणाऱ्या 26 जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू होईल अशी जोरदार चर्चा रंगत होती पण अजूनही सरकारकडून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

 नेमकं काय म्हणत आहेत गृहमंत्री अनिल देशमुख ?

 येणाऱ्या 26 जानेवारीपासून मुंबई नाईट लाईफ सुरू होईल असं वाटत नसल्याचं अनिल देशमुख म्हणाले.  नाईट लाईफ बाबत अद्यापही सरकार कडून कुठलीही प्रक्रिया झालेली नाहीये. याबाबत पहिल्यांदा कॅबिनेट मीटिंग मध्ये चर्चा होईल मगच त्यानंतर नाईट लाईफ बाबत विचार करण्यात येईल.  पुढे बोलताना ते म्हणाले, पोलिस खात्यावर नाईट लाईफचा प्रचंड ताण येणार आहे. पोलिस यंत्रणा नाईटलाइफ साठी कशी कार्यान्वित करण्यात होईल, यंत्रणा कशी राबवता येईल याचा देखील सरकार विचार करेल आणि त्यानंतरच नाईट लाईफ बाबत सरकार निर्णय घेईल.

मुंबई मधील हॉटेल रेस्टॉरंट चोवीस तास सुरू ठेवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे.  खुद्द आदित्य ठाकरे यांनी देखील आपली इच्छा बोलून दाखवली होती. तिकडे आशिष शेलार मात्र नाईट लाईफला विरोध करताना दिसत आहेत. तरुणाई या नाईट लाईफच्या प्रतीक्षेत आहे. मात्र कॅबिनेट मिटिंगमध्ये या बाबत काय निर्णय होतो याकडे तरुणाईचं लक्ष लागून आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News