मोबाईल नेटवर्कसाठी तरूण घेतात झाडांचा आसरा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020

परिसरातल्या एखाद्या झाडावर मोबाईलला नेटवर्क मिळाल्यानंतर तरूणांचा आनंद गगनात मावेनासा होतो अशी माहिती तेथील एका स्थानिक तरूणाने सांगितली. 

मोबाईल नेटवर्कसाठी तरूण घेतात झाडांचा आसरा 

वाडा - कोरोनाच्या काळात अनेकजण घरातून काम करत आहेत. मागील चार महिन्यांपासून अनेकांनी मोबाईलवरती शक्य असेल असे काम करण्यास सुरूवात केली आहे. पण ग्रामीण भागात इंटरनेटची आणि मोबाईल नेटवर्कच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे वाडा परिसरातील तरूणांनी नेकवर्क नसल्याने कामासाठी झाडांचा आसरा घेतला आहे. 

वाडा तालुक्यातील उज्जेनी, आखाडा, मांगरुळ, ओगदा, पाचघर परिसरात नेटवर्क येत नसल्याने तरूण डोंगरावरती, झाडावरती आणि जंगलात असल्याचे चित्र आहे. प्रत्येकाला आपली नोकरी टिकवण्यासाठी काहीतरी काम करावं लागतं. त्यामुळे कंपनीकडून तुटपुंज्या पगार मिळत आहे. अनेकदा उंच झाडावर नेटवर्क मिळत असल्याने तरूण झाडांचा आधार घेत आहेत. 

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बीएसएनएलचे नेटवर्क शहरात उपलब्ध होत नाही, तसेच ग्रामीण भागात मोठा बीएसएनएलचा पुर्णपणे बो-या वाजला आहे. नेटवर्क कंपन्यानी संपुर्ण भारतभर टॉवर उभे केले असले तरी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या अजून जैसे थे आहे. 

परिसरातल्या एखाद्या झाडावर मोबाईलला नेटवर्क मिळाल्यानंतर तरूणांचा आनंद गगनात मावेनासा होतो अशी माहिती तेथील एका स्थानिक तरूणाने सांगितली. 

वाडा तालुक्यातील ग्रामीण भागांत कोणत्याही कंपनीच्या सीमकार्डला रेंज मिळत नाही. रेंजअभावी मोबाइल बंद पडले आहेत – प्रदीप कुवरा, ग्रामस्थ, आखाडा, वाडा तालुका

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News