तरूणांनी जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींनी जिद्द बाळगून सातत्यपूर्ण अभ्यास करावा. योग्य क्षेत्राची निवड केल्यास यश हमखास मिळेल.

कायगाव : ‘‘ स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींनी जिद्द बाळगून सातत्यपूर्ण अभ्यास करावा. योग्य क्षेत्राची निवड केल्यास यश हमखास मिळेल,’’ 
असा सल्ला गळनिंब येथील दिवाणी न्यायाधीशपदी निवड झालेले नीलेश लक्ष्मणराव दहातोंडे यांनी दिला. कायगाव येथील गोदावरी इंग्लिश स्कूलतर्फे मंगळवारी सकाळी त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बहुद्देशीय पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष विजय बनसोड, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य सुमित मुंदडा, ॲड.अविनाश कुलकर्णी, ॲड. एकनाथ कानडे, ॲड.अमोल रासकर उपस्थित होते.श्री. दहातोंडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, माजी राष्ट्रपती कै. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील ‘मेरे मन की कल्पनायें’ हे पुस्तक देण्यात आले. 

ॲड. दहातोंडे म्हणाले, ‘‘मित्रांनो जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करा. योग्य क्षेत्र निवडा आणि मोठे अधिकारी व्हा. परीक्षेबाबत नैराश्‍य बाळगू नका. चांगला अभ्यास करून यशस्वी व्हा. देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यवस्थेत सहभागी व्हा. मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. औरंगाबादला वकिलीचे शिक्षण पूर्ण करून तेथेच जिल्हा न्यायालयात, नंतर गंगापूरच्या न्यायालयात वकिली केली. 

वडिलांच्या इच्छेनुसार स्पर्धा परीक्षेद्वारे न्यायाधीश झालो. त्यासाठी कोणताही क्‍लास लावला नाही.’’ यावेळी प्रा. मनोज बंगाळे, लक्ष्मीकांत व्यास, कृषी सहायक श्‍यामकुमार काळे, डॉ. अमित रॉय, शेतकरी नेते संपत रोडगे, ताराचंद निरपळ, अशोक मोरे, संभाजी निरपळ, अशोक फटाकडे, मुख्याध्यापिका मीरा कानडे, शिक्षिका रूपाली रासकर, लोचना जाधव, कल्याणी मुळे, पूनम पुरम आदी उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News