तरुणींच्या कौमार्य चाचणीस तरुणांचाच विरोध

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 13 May 2019

कंजारभाट समाजामध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री वधूची कौमार्य चाचणी घेतली जाते. समाजातील पंचाना रक्ताचा डाग पडलेली चादर दाखवून मुलीचे चारित्र्य चांगले आहे असे सिद्ध करावे लागते 

लग्न म्हटंल की मानपान, प्रथा, परंपरा आल्याच. अशीच एक प्रथा कंजारभाट समाजात आजही टिकून आहे. 'कंजारभाट' समाजात लग्न जोडण्याचे काम   पंचाचे आसते. लग्ना नंतर त्या वधूला कौमार्य चाचणी परीक्षा द्यावी लागते. महिलांना छळणारी ही अनिष्ठ प्रथा समाजातील सुशिक्षित तरुणांनी मोडून काढणारा धाडसी निर्णय घेतला.

धनंजय तमायचीकर आणि प्रियंका इंद्रेकर यांनी स्वत:चा साखरपुडा ठरवताना पंचांना बोलावले नाही. वधू व समाजातील महिलांचे मत जाणून घेतले. आणि समाजाती जानत्या व्यक्तिच्या मदतीने साखरपुडा झाला. कौमार्य चाचणीच्या विरोधात समाजातील सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेऊन 'स्टॉप व्ही टेस्ट' ही मोहीम सुरू केली. या मोहिमेला प्रचंड विरोधही झाला. तरीही पंचांची दहशत झुगारून समाजबदलासाठी या तरुणांनी या विधायक कामाची सुरुवात केली
   
कंजारभाट समाजातील पंचांचे कार्य
विवाह ठरवतांना पंचांना प्रत्येकी सहाशे रुपये व वर भेट म्हणून स्वेच्छेने काही हजार रुपये द्यावे लागतात. लग्न केव्हा करायचे, मानपान काय करायचा हे पंच ठरवत असतात. वधू-वरांच्या पालकांना आणि लग्न करण्यासाठी तयार असलेल्यांना काहीत अधिकार नसतात.  

कौमार्य चाचणी 
कंजारभाट समाजामध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री वधूची कौमार्य चाचणी घेतली जाते. समाजातील पंचाना रक्ताचा डाग पडलेली चादर दाखवून मुलीचे चारित्र्य चांगले आहे असे सिद्ध करावे लागते 

गरजू महिलेला मदत 
यापुढे पंचाना पैसे देण्याऐवजी ते दुर्बल घटकांतील महिलांना देण्यात येणार आहेत. आर्थिक मदतीचे स्वरूप फार मोठे नसले तरीही नव्या विधायक गोष्टीची सुरुवात तरुणाईने केली हे स्त्री मुक्तीच पाऊल समाजासाठी महत्वात आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News