तरूणांना संस्कृत भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 January 2020

विद्यार्थी आणि युवकांनी आपली श्रेष्ठ  देवभाषा संस्कृत भाषा आत्मसात करावी. जेणेकरून अनेक तऱ्हेचे पुरातन ग्रंथ आपल्याला वाचनात येतील. शालेय अभ्यासक्रमातही संस्कृत भाषेचा अंतर्भाव होणे गरजेचे आहे.

शिरोडा : विद्यार्थी आणि युवकांनी आपली श्रेष्ठ  देवभाषा संस्कृत भाषा आत्मसात करावी. जेणेकरून अनेक तऱ्हेचे पुरातन ग्रंथ आपल्याला वाचनात येतील. शालेय अभ्यासक्रमातही संस्कृत भाषेचा अंतर्भाव होणे गरजेचे आहे. संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसारावेळी सद्‌गुरू ब्रह्मेशानंद स्वामीजींनी चालवलेले कार्य वाखणण्याजोगे आहे, असे प्रतिपादन शिरोडाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी केले. अमळाय पंचवाडी येथे स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी तपोभूमी संचालित स्वामी ब्रह्मानंद संस्कृत पाठशाळा आयोजित संस्कृत संभाषण शिबिराच्या उद्‌घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिरोडकर बोलत होते.

पंचवाडी येथील श्री सातेरी भगवती देवस्थान सभागृहात झाले. याप्रसंगी स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालयाचे प्रा. वेदमूर्ती ज्ञानेश्‍वर पाटील, पंचवाडीचे सरपंच ऍन्थनी डिकॉस्ता, पंचायत सदस्य क्रिस्तेव डिकॉस्ता, पंचशील हायस्कूलचे मुख्याध्यापक निळकंठ गावकर, रामनाथ गावकर, अमळाय पंचवाडी भक्तमंडळ अध्यक्ष दयानंद गावकर, शिरोडा भक्तमंडळ अध्यक्ष सुदाम नाईक, संस्कृत आचार्य ईशा भाईडकर, पंचवाडी अमळाय संस्कृत आचार्य नमिता गावडे, पूजा पंचवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.अशा प्रकारची शिबिरे मंडळाने गावागावात घेण्याचे आवाहन सुभाष शिरोडकर यांनी केले.यावेळी ज्ञानेश्‍वर पाटील म्हणाले की, संस्कृत भाषा ही ज्ञानभाषा देव भाषा आहे. या भाषेतून आपले धर्मग्रंथ आहे.

संस्कृत भाषेतून जगाला मौलिक ज्ञानसंपदा लाभलेली आहे. या भाषेतून ज्ञान, विज्ञान, आचरण नीतीमुल्ये, संस्कार, संस्कृती यांचा विपूल ठेवा आणि खजिना भरून राहिलेला आहे. उत्तम शिक्षण आणि उत्तम शासन यामुळे देशाचा अभ्यूदय घडेल, असे पाटील यांनी सांगून अभ्यासक्रमातून लुप्त होत चालले संस्कार हे देशात चाललेल्या हिंसाचाराला कारणीभूत ठरत आहेत.

संस्कृत भाषेच्या अध्ययनातून मिळालेल्या चांगल्या आणि आदर्शवत संस्कारामुळे देशात शांती प्रस्थापित होईल, असेही पाटील म्हणाले. प्रमुख पाहुणे आमदार शिरोडकर वेदमूर्ती पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. प्रार्थना आणि शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. 

संतसमाज पंचवाडीचे अध्यक्ष दयानंद गावकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पुरुषोत्तम वेळीप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या शिबिरात पंचवाडी  अमळाय भागातील १०० विद्यार्थ्यी सहभागी झालेले असून या शिबिरात स्वपरिचय, सुभाषिते संवाद, शिष्टाचार, संस्कृत गीत समय, अव्यय, सरळ वाक्‍याभाव आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News