वयाच्या 30 वर्षांपुर्वी तरुणींनी ही 10 कामे करणे गरजेचे...

यिनबझ टीम
Wednesday, 11 March 2020

एखादी स्त्री घर, कुटुंब आणि लग्नाच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबली जाते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या भूमिकेत राहून त्याला आव्हानांचा सामना करावा लागतो.

एखादी स्त्री घर, कुटुंब आणि लग्नाच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबली जाते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या भूमिकेत राहून त्याला आव्हानांचा सामना करावा लागतो. कदाचित हेच कारण आहे की इतरांच्या स्वप्नांना सांभालण्याच्या नादात स्वतःच्या इच्छांना दाबून ठेवावे लागते. म्हणूनच, प्रत्येक महिलेने वयाच्या तिशीआधी ही 10 कामे करणे गरजेचे आहे.

1. भीतीवर नियंत्रण ठेवा - बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की प्रत्येक महिलेला लहानपणापासूनच एखाद्या गोष्टीबद्दल भीती असते. बऱ्याच महिला पाणी, उंची, खोली यांना घाबरतात. अनेकांच्या मनात काल्पनिक गोष्टींना घेऊन भिती असते. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

2. आपल्याकडे काहीतरी स्वत:च असावं - जर आपण एखादे काम केले असेल आणि आपल्या कष्टाचे पैसे मिळवले असतील तर त्या पैशांनी स्वत:साठी खास काहीतरी विकत घेणे आपल्यासाठी चांगले होईल. त्यामुळे आपल्याला स्वत: त्याचा अभिमान वाटेल.

3. प्रेम करा - ज्याप्रमाणे एखाद्या शरीराला जगण्यासाठी पाण्याची गरज असते त्याच प्रकारे आत्म्यास प्रेमाची देखील आवश्यकता असते. प्रेमाशिवाय माणूस जीवनात अपूर्ण राहतो. त्यामुळे तुम्हीही प्रेम करा, त्यासाठी तुम्हाला प्रियकराचीच गरज आहे असं नाही.

4. काही साहसी करा - जीवनात काही रोमांचक गोष्टी करणंही महत्त्वाचं आहे. जर आपण स्वत:ला असे काहीतरी करण्याचे आव्हान केले तर ते आपणास उर्जा देईल आणि काही क्षण आपल्या जीवनातील आनंददायक असतील.
 
5. खूप ठिकाणी फिरणे - प्रत्येक तरुणीचे अथवा महिलेचे स्वप्न असते की आपण देशाबाहेरील किंवा देशातील अनेक ठिकाणी भेट द्यावी. जेणेकरून ते त्यांचे जगणे आणि जीवणाचा आनंद घेतील आणि त्यांना तेथील संस्कृतीची जाणीव होऊ शकेल.

6. काहीतरी नवीन जाणून घ्या - शिकणे हा जीवनाचा एक भाग आहे, जो आपल्याला पूर्वीपेक्षा चांगला होण्यास नेहमीच मदत करतो. आयुष्यात नेहमी काहीतरी शिकले पाहिजे. जर आपण वयाच्या 30 व्या वर्षाआधी काही मनोरंजक गोष्ट शिकली तर ती आयुष्यभर आपल्या जीवनाशी जोडेलेली असेल.

7. आपल्या शरीरासह आरामदायक व्हा - जरी आपण किशोरवयीन असताना खूप मेहनत घेतली असली तरी वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी आपल्या शरीराला आराम देणे गरजेचे आहे. आपले शरीर जसे आहे, तसेच त्याचे कौतुक करा. आपले आयुष्य पूर्वीपेक्षा खूप सोपे होईल.

8. स्वत: ला तंदुरुस्त ठेवा - तरुणींसाठी 20 ते 25 वर्षे वयोगटात फीट राहाणे खूप महत्वाचे आहे. यावेळी आपल्याला स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याची आवश्यकता आहे. आपल्या शरीराकडे आता दुर्लक्ष करण्याची ही वेळ नंतर हानिकारक ठरू शकते.

9. आपली स्टाईल बदला - एकाच लुकमध्ये असल्याने कोणालाही कंटाळा येऊ शकतो. आपल्या कधी कधी वाटते की आपण नवीन स्टाईल्स स्वीकारल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्या राहाणीमानात आत्मविश्वास येऊ शकेल.

10. स्वसंरक्षण - आज प्रत्येकासाठी स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे. आपल्याला स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या  मजबूत बनविणे महत्वाचं आहे. आपण ज्युडो, कराटे, योगा, प्राणायाम यासारख्या गोष्टींचा सराव करू शकता. यामुळे आपण खूप सक्षम आणि परिपूर्ण राहू शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News