तरुणांनो ही दोन योगासने करा, तुमचे गाल एकदम...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 21 March 2020
  • स्वत:चा फिटनेस आणि लूक सुधारण्यासाठी तरुण आणि तरुणी सहसा जिमची मदत घेतात. ज्यासाठी बरीच किंमत मोजावी लागेल. परंतु आज आम्ही तुम्हाला ती दोन योगासने सागणार आहोत, जे करण्यासाठीही सोपी आहेत आणि  त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर नूर येऊ शकतो.

नवी मुंबई: योगासने करण्याच्या फायद्यांविषयी आपण सर्वांनी ऐकले आणि वाचलेदेखील आहे. आपल्यातील बर्‍याच जणांनी आपला स्वास्थ्य आणि आरोग्य लक्षात ठेवून जेव्हा वेळ असेल तेव्हा योगासन करणे गरजेचे आहे. परंतु आज आम्ही त्या दोन योगांविषयी बोलू जे आपल्या चेहऱ्यावरील त्वचेला तरूण ठेवण्यास मदत करतात. शशकासन और हस्पादासन.

शशकासन

शशकासनला शशांक आसन देखील म्हणतात. या योगासनादरम्यान, शरीर ससाच्या आकारात येते, म्हणून त्याला शशकासन म्हणतात. संस्कृत भाषेत सशाला शशक: म्हणतात. याच आधारावर या आसनाला शशकासन असे नाव देण्यात आले.

या आसनामुळे त्वचेला चमक कशी येते हे जाणून घेऊ. खरं तर जेव्हा आपण हा पवित्रा पूर्णपणे करतो, तेव्हा आपण शशकासनाच्या रुपात येतो. तेव्हा आपल्या चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात, चेहर्‍यावर दबाव येतो. यावेळी, चेहर्यावरील स्नायूंचा व्यायाम केला जातो आणि त्याद्वारे रक्त परिसंचरण वाढते. ज्यामुळे त्वचा चमकीत बनते.

हस्तपादासन

हस्तपादासन हे नाव त्याच्या आकारामुळे ठेवण्यात आले आहे. वास्तविक संस्कृत भाषेत हाताना हात तर पायांना पाद म्हणतात. या आसना दरम्यान आम्ही पायांच्या तळव्यांना हाताने धरून ठेवतो. म्हणून त्यास हस्तपादासन असे नाव देण्यात आले आहे.

शशाकासन दरम्यान, आपल्या मान आणि चेहऱ्याच्या स्नायूंवर ताण पडतो. तर या आसनावेळी त्या स्नायुंवर दबाव पडतो. ज्यामुळे रक्त परिसंचरण वाढते. तर हस्तपादासन करताना रक्ताचे रक्ताभिसरण आपोआपच आपल्या चेहऱ्याकडे होत असते. यामुळे त्वचा चमकते आणि तरूण दिसते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News