तरुणात मावळ्यांचे गुण दिसत नाहीत: प्रतिक कांबळे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

विक्रोळी येथील आंबेवाडीमध्ये महाड तालुका क्रिडा मंडळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती साजरी केली.

मुंबई: आजचा तरुण फक्त कपाळाला चंद्रकोर, गळ्यात माळ, हातात धारधार शस्त्र आणि दाढी वाढवून महाराजांचे मावळे होण्याच्या अविर्भावत मिरवतो मात्र मावळ्यांचे गुण दिसत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज सारखे वागणे तर सोडा पण आजच्या तरुणाई मध्ये रयतेच्या संरक्षणाची आग दिसून येत नाही असे मत कवी प्रतिक कांबळे यांनी व्यक्त केले.

विक्रोळी येथील आंबेवाडीमध्ये महाड तालुका क्रिडा मंडळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती साजरी केली. यावेळी प्रतिक बोलत होतो. कार्यक्रमात महाराजांची आकर्षित मुर्ती व किल्ला साकारण्यात आला होता. मंडळाच्या वतीने विभागातील लहान बालकांनसाठी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. खेळातील विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात करण्यात आला. यावेळी लाठी फिरवणे, महाराजांच्या पराक्रमाची गाथा मांडणे असे उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाड तालुका क्रिडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News