किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात "या" तरुण नेत्यांकडे युवक आकर्षित  

स्वप्नील भालेराव, सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

लोकसभा मतदार संघात नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, लोहा, नायगाव, देगलूर, मुखेड, भोकर, हदगाव, किनवट या नऊ विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. 

नांदेड: लोकसभा मतदार संघात नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, लोहा, नायगाव, देगलूर, मुखेड, भोकर, हदगाव, किनवट या नऊ विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. 

किनवट विधानसभा
किनवट-माहूर दोन तालुके एकत्र करुन किनवट विधानसभा मतदार संघ ठरवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार प्रदीप नाईक यांनी सलग तिन टर्म निवडून येत हॅट्रिक पुर्ण केली. आगामी निवडणूक  त्याच्यासाठी अवघड जाणार आहे. कारण किनवट-माहूर हा मतदारसंघ हिंगोली लोकसभेत येतो. यावेळी लोकसभेला शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे शिवसेनेला किनवट-माहूर विधानसभा मतदार संघाची जागा मिळू शकते. खासदार हेमंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विविध कार्यक्रमातून उमेदवाराची चाचपणी सुरु केली आहे.

आदिवासी सामाज विकासापासून कोसो दूर
किनवट-माहूर तालूका आदिवासी, अतिदूर्गम, मागास आहे. आदिवासी सामाजाच्या विकासाकरिता केंद्र व राज्य सरकार दरवर्षी करोडो रुपये निधी दिला जातो. तरी आदिवासी समाजाची परिस्थीती "जैसी थे" आहे. आदिवासी सामाजाच्या विकासाकरिता आलेला निधी ईतर ठिकाणी वळवला जातो. राजकीय गुत्तेदारीतून तो खर्च केला जोतो, असा आरोप आदिवासी समाजाकडून सतत होत असतो. आजही आनेक आदिवासी पाडे मुलभुत विकासापासून वंचित आहेत. त्यामुळे आदिवासी समाज आपल्या हक्कासाठी वंचित बहूजन आघाडी सोबत जाऊ शकतो.

बेरोजगारीमुळे तरुणाईचे स्थालांतरण
विद्यमान आमदार सलग तिन टर्म निवडून आले. त्यांनी एकही मोठा उद्योग मतदार संघात उभारला नाही, त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. बेकारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बेरोजगाराच्या शोधात तरुणाई तेलंगाणा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात स्थालांतरण करित असते. घरापासून दुर राहून अनेक समस्यांचा सामना तरुणांना करावा लागतो. त्यामुळे तरुण आमदार हवा अशा सुर तरुणाईकडून निघत आहे.

किनवट जिल्ह्याची मागणी
नांदेड शहरापासुन 150 कि.मी अंतरावर किनवट तालूका वसला आहे. नागरिकांना कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करण्यातच दिवस संपतो. त्यामुऴे नागरिकांचे प्रंचड हाल होतात. अनेक वर्षांपासुन किनवट जिल्ह्याची मागणी नागरिक, समाजसेवक, पत्रकार, व्यापारी करत आहेत. मात्र राजकीय पुढारींना हा प्रश्न सोडवता आला नाही.

या तरुण नेत्यांकडे तरुणाई आकर्षित 
महसुल विभागाचे राज्यमंत्री संजय राठोड यांचे मेव्हणे शिवसेनेचा युवानेता सचिन नाईक यांच्यासोबत युवकांचा फोजफाटा उभा आहे. सचिन नाईक यांनी पाच वर्षांपासून निवडणुकीच्या तयारीला सुरवात केली होती. ग्रामीण भागात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि प्रतिसाद मिळत आहे. क्रिकेट, कबड्डी, फॉलीबॉल आदी सामन्याचे आयोजन करुन युवकांशी नाळ जो़डली आहे. लोकउपयोगी सामाजिक कामाचा पुढाकार नाईक यांनी घेताला होता.

प्रा. डॉ. हमराज उईके सुशिक्षीत आणि पुरोगामी विचारांचा युवा नेता म्हणून ओळखला जातो. तरुणाईच्या समस्यांची जाण असलेला नेता आहे अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे तरुणाई हमराज उईके यांच्याकडे आकर्षित होतो. विविध भाषांवर प्रभुत्व, स्थानिक समस्यांची मुद्देसुद मांडणी यामुळे त्यांच्या सभेला गर्दी गोळा होत. ही गर्दी मतदानाच्या दर्दीत बदल्याचे कौशल्य उईके यांच्याकडे आहे. त्यांनी तरुणाईचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. सध्या अध्यापन बरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता म्हणून काम पाहत आहेत. 

जातिय समिकरण
इरावती कर्वे म्हणतात "जी जात नाही, ती जात" ही जातिय राजकारणार प्रकर्षाने जाणवते. अनुसुचीत जमाती (गोंड, प्रधान, भिल्ल) आणि विमुक्त भटक्या जमाती (बंजारा) या दोन समाजाचे मतदान विधानसभेला निर्णायक भुमिका ठरवीत असते. मराठा, एस.सी, वंजारी आणि इतर समाजाचे मतदान अल्प प्रमाणात आहे. 

प्रा. डॉ. हमराज उईके यांच्याकडे अनुसुचित जमाती आणि एस.सी समाजाचे मतदार वळतील, तर सचिन नाईक यांच्याकडे विभज आणि वंजारी समाजाचे मतदार वळतील बाकी इतर समाजाचे मतदार दोंघात विभागले जाईल अशी सध्या परिस्थिती आहे. निवडणुकीत शेवटपर्यंत कुछ भी हो सकता है! 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News