तरुणांना मिळतेय भाजपात संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

रायगड जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यात तरुणांना संधी देण्यात आल्याने पक्षाला चांगले दिवस येतील, अशी चर्चा आहे.

खोपोली : भाजपची खालापूर तालुका कार्यकारिणी व उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यात तरुणांना संधी देण्यात आल्याने पक्षाला चांगले दिवस येतील, अशी चर्चा आहे.

जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेले विठ्ठल मोरे कोयना समाजाचे नेते असल्याने त्यांचा संघटना बांधणीसाठी फायदा होईल. जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव याला संधी देऊन तरुणांत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तालुका युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी महड गावातील प्रसाद पाटील याची निवड केल्याने तालुक्‍यातील भाजपचे सर्वच कार्यकर्ते आनंदीत झाले आहेत. खोपोली शहरातील कार्यकारिणीतही तरुणांना संधी दिली आहे. तालुका कार्यकारिणीतही युवकांवरच जास्त विश्‍वास व्यक्त केला आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांमुळे भाजपचा खालापूर तालुक्‍यात विस्तार होण्यास मदत मिळणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News