प्रतीक्षा यादीतील तरुण महावितरमध्ये विना वेतन काम करणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 June 2020
  • उर्जा मंत्री नितिन राऊत यांच्याकडे बेरोजगार अभियंत्यांनी मागणी

मुंबई : महावितणाच्या प्रतिक्षा यादीतील सुशिक्षित तरुण बेरोजगार अभियंत्यांनी एक वर्ष विना वेतन काम करण्याची तयारी दर्शविली. उर्जा मंत्री नितिन राऊत यांना एक पत्राद्वारे बेरोजगार अभियंत्यांनी ही विनंती केली. 2015 मध्ये महावितरण कंपनीने नोकर भरती केली. काही सुशिक्षित अभियंत्यांना जा क्रं 03/2015 नुसार प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. प्रतिक्षा यादीत उमेदवारांचे नाव असल्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, कोरोनामुळे राज्यावर आर्थिक संकट आले. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने यंदा नोकरी भरती स्थगीत केली. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील तरुण बेरोजगार अभियंत्याचे स्वप्न भंग झाले.

महावितरण कंपनीने सहाय्यक अभियंता पदाची परिक्षा १ नोव्हेंबर २०१५ रोजी घेतली. त्यानंतर ८२६ सहाय्यक अभियंत्यांची नियुक्ती केली. आणि ४१५ अभियंते प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. १६ नोव्हेंबर २०१६ ते ११ जानेवार २०१७ दरम्यान २१२ प्रतीक्षा यादीतील अभियंत्यांची नियुक्ती झाली. सध्या २०३ सहाय्यक अभियंते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पदोन्नती, सेवानिवृत्ती आणि नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या अभियंत्यांनी राजीनामा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात सहाय्यक अभियंता पदाच्या जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यापेक्षा प्रतिक्षा यादीतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संधी दिल्यास महावितरण कंपनीचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होणार आहे.

लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसायीक आणि घरगुती दोन्ही ग्राहकांनी तीन महिने विज बील भरले नाही, त्यामुळे महावितरण कंपनी अर्थिक संकटात सापडली. अशा वेळी प्रतीक्षा यादीतील बेरोजगार तरुणांनी एक वर्ष विना वेतन काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीला विनामुल्य मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. 

प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सुवेत रुजू करुन घेण्याचे आदेश उर्जामंत्र्यांनी महावितरण कंपनीला द्यावे आणि महावितरणमध्ये काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती प्रतिक्षा यादीतील तरुणांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News